सुरगाणा : तहसीलदारांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

सुरगाणा : तहसीलदारांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

तालुक्यात दोन दिवसापुर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कादा शेती भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन मुळीक यांनी आज तालुक्यातील विविध भागातून नुकसानग्रस्त पीकपाणीचा पहाणी दौरा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे आंबा कादा,गहु,टाबेरी, तसेच घराची मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन असंख्य शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील शेतकरी हा कोरडवाहू खरीप शेतीवर अवलंबून आहे. वर्षभरात एकच पिक घेतले जाते.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यावेळी हाता तोंडाशी आलेला घास ह्या अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कोलमडला असून झालेल्या संपूर्ण खर्चाची नुकसान भरपाई शासनाने देण्याची मागणी केली जात आहे. तहसीलदार सचिन मुळीक यांनी तालुक्याच्या विविध भागातून पीकपाणी नुकसानीचा पहाणी दौरा सुरू केला असून शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

यावेळी तहसीलदार मुळीक यांनी तालुक्यातील साजोळे,हदगड,बोरगाव, खोकरी,आदी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार सचिन मुळीक यांनी शेतकऱ्यांना दिले असून तालुक्यातील ईतर ठिकाणी प्रशासनाने आदेशीत केल्यानुसार तलाटी,ग्रामसेवक कृषीसहाय हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे कार्यवाही सुरू आहे,

पंचनामा करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी सुरू केले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणताही बाधित शेतकरी शिल्लक असल्यास, पंचनामा करण्यासाठी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून पंचनामा पूर्ण केला जाऊ शकतो.

सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com