विभागीय महसूल आयुक्तांकडून बिटको रुग्णालयाची पाहणी

विभागीय महसूल आयुक्तांकडून बिटको रुग्णालयाची पाहणी

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

करोनाच्या तिसर्‍या लाटेला third Wave of corona सुरुवात होणार अशी परिस्थिती दररोज येणार्‍या रुग्णवाढीच्या आलेखावरून दिसत आहे. येथील बिटको कोविड सेंटरमध्ये Bytco Covid Center रुग्णांची गर्दी वाढत असल्याने वैद्यकीय पथकाने तिसर्‍या लाटेची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कामासाठी आलेल्या विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game यांनी सामाजिक कार्याचा भाग म्हणून बिटकोला भेट दिली. बिटको कोविड सेंटरमधील तिसर्‍या लाटेच्या तयारीची पाहणी केली.

नातेवाईक रुग्णास भेटण्यासाठी विभागीय आयुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे हे बिटको कोविड सेंटरमध्ये आले. गमे यांचा नियोजित व शासकीय दौरा नसल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गडबडून गेले. नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या गमे यांनी नातेवाईक रुग्णासह अन्य रुग्णांची आस्थेने चौकशी केली.

तसेच रुग्णालयातील इतर विभागातील सुविधांची पाहणी केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण केंद्राला त्यांनी आवर्जून भेट दिली. वैद्यकीय अधिकारी व सेवकांशी संवाद साधून त्यांना मागदर्शन केले. त्याचबरोबर बिटको सेंटर प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्याशी चर्चा करत पहिल्या व दुसर्‍या लाटेप्रमाणे तिसरी लाटही यशस्वीपणे हाताळण्याबाबत मार्गदर्शन केले.

बिटकोत एरवी एक ते दोन रुग्ण येथे उपचार घेत असे. मात्र, आजमितीस पंचवीस करोना रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याचे डॉ. धनेश्वर यांनी सांगितले. संशयित रुग्ण करोनाची चाचणी करून घेण्यासाठी येत आहे. त्यांची संख्या वाढली आहे. कोविड सेंटर पूर्णपणे भरले आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com