सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम

मनपाचे 30 पथके तैनात
सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेने NMC विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र कायद्याची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका हद्दीतील सर्व सोनोग्राफी केंद्रांची sonography centers तपासणी मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची३० पथके तैनात करण्यात आली असून १५ जानेवारीपर्यंत तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे Medical Superintendent Dr. Bapusaheb Nagargoje यांनी या पथकांना दिले आहेत.

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र एकविसाव्या शतकातही ‘मुलगाच वंशाचा दिवा’ ही पुरातन खुळचट कल्पना समाजातील काही वर्गांमध्ये कायम आहे. त्यामुळे छुप्या पध्दतीने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान करून स्त्री भू्रण हत्येचे प्रकार काही प्रमाणात का होईना सुरूच आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद केली आहे.

त्याउपरही अधूनमधून अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्यामुळे शहरातील सर्व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहिम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात ३४४ सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी आतापर्यंत झाली आहे. त्यापैकी ३२२ सोनोग्राफी केंद्रे प्रत्यक्षात सुरू आहेत. १० केंद्रे तात्पुरते बंद आहेत तर लिंग निदान होत असल्याच्या तक्रारींवरून १२ सोनोग्राफी केंद्रे सील करण्यात आली आहेत. कायद्यातील तरतुदींनुसार महापालिका हद्दीतील सोनोग्राफी केंद्रांची त्रैमासिक तपासणी करणे बंधनकारक आहे.

तक्रार करा

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान होत असल्यास हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ तसेच संकेतस्थळावर संपर्क करून तक्रार करता येणार आहे. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या पथकांना दैनंदिन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अहवाल सादर न केल्यास पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत तसेच महाराष्टÑ प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९५६ अन्वये शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com