रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांकडून पाहणी

रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांकडून पाहणी

पाटोदा | Patoda

पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू असल्यामुळे करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना व संचारबंदी नियम अंमलबजावणीचा भाग म्हणून येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी पाटोदा येथे भेट देऊन पाहणी केली.

तसेच सकाळी अकरानंतर शंभर टक्के बंद ला प्रतिसादामुळे नागरिक शासनास सहकार्य करत असल्याबद्दल नागरिक व व्यापार यांचे कौतुक केले. तसेच स्थानिकांनी असेच प्रशासनास सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.

तसेच संचारबंदी काळात व जिल्हाबंदी काळात कुणीही विनाकारण विनापरवानगी बाहेर भटकू नये असे आव्हान केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com