नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांनी साेमवारी संमेलन स्थाळाची पाहणी करुन विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

संमेलन अधिक निविर्घ्न पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकारी म्हणून रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नेमणूक केली आहे. रविवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर सर्वच विभाग कामाला लागले असून साेमवारी त्यांनी संमेलन स्थळाची पहाणी केली.

यामध्ये नाशिक महापालिकेचे अपर आयुक्त सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव बच्छाव, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कल्पना कुटे, आरोग्य विभागाचे प्रशांत शेटे, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी संजय बैरागी, आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशांत वाघमारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी समंलनस्थळाचा पहाणी करुन समाधान व्यक्त केले व कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या याची यादी तयार केली.

अधिकाऱ्यांनी सुचना केल्या. हे संमेलन नाशिककरांचे आहे. ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे होईल याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे सांगितले. त्याच्या सोबत लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, उपाध्यक्ष भगवान हिरे, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव सुभाष पाटील, संजय करंजकर, अमोल जोशी यांच्यासह अधिकारी कायर्कर्ते उपस्थित होते.