मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू

मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) विस्तारीत क्षेत्रात (Extended area) समाविष्ट करण्यात आलेल्या मौजे नाशिक तालुका (nashik taluka), जिल्हा नाशिक (nashik district) गावाच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे नगर भूमापन नकाशे (Town survey maps) तयार करण्यात आले आहेत.

यासाठी मालकी हक्क (Ownership) निश्चितीसाठी मिळकतीचे हक्क चौकशीचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (Special Deputy Superintendent Land Records and Inquiry Officer) (श.मा.) क्र 1 नाशिक (nashik) किशोरचंद्र देवरे (Kishorchandra Deore) यांनी दिली.

मे 2022 मध्ये मौजे नाशिक तालुक्यातील सर्वे नंबर 874/6, 7, 8, 9, 875/1, 2 व 871, 876, 873, 880, 881 मधील सर्व मिळकतींचे हक्क चौकशीचे काम उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र 1 नाशिक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. याअनुषंगाने पुराव्याअभावी होणार्‍या संभाव्य त्रुटी टाळण्यासाठी मिळकतधारक नागरिकांनी त्यांचे हक्क सिद्ध करणारे पुरावे व दस्ताऐवज विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्रमांक 1, महापालिका नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय इमारत (टेरेसवर), नवीन पंडित कॉलनी (New Pandit Colony), शरणपूररोड (sharanpur road), नाशिक (nashik) येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकशी पूर्ण झाल्यावर नकाशे अंतिम करून मालमत्तापत्रक तयार करण्यात येणार आहे. मिळकतधारकांनी आपल्या मिळकतीचा नकाशा व हक्काची नोंद अचूक झाल्याची खातरजमा करून घ्यावी, असे देवरे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com