जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या वाहनांची चौकशी

जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या वाहनांची चौकशी

नाशिक-नगर हद्दीवर दोन चेकपोस्ट

सिन्नर । प्रतिनिधी

सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गुरुवारी रात्री आठ वाजेपासून जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नाशिक-पुणे मार्गावर कर्‍हे घाटात तर सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत.

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून 1 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा कररण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले असून महत्वाचे कारण नसल्यास नागरिकांना इतर जिल्ह्यात प्रवास करता येणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वावी पोलीसांकडून नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर दोन ठिकाणी चेकपोष्ट सुरू करण्यात आल्या आहेत.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस. बी. कोते यांनी जिल्हा हद्दीवर चेकपोस्टचे नियोजन केले. एक अधिकारी व पाच कर्मचार्‍यांचा एका चेकनाक्यावर समावेश आहे. हे चेकपोस्ट 24 तास कार्यरत राहणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक त्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com