जिल्हा बँकेच्या संचालकांची चौकशी पूर्ण

आता लक्ष ८८ अंतर्गत चौकशी सुनावणीच्या निकालाकडे
जिल्हा बँकेच्या संचालकांची चौकशी पूर्ण

नाशिक । . प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या NDCC Bank सुमारे ३७ माजी संचालकांसह १७ सेवकांची सहकार कायद्यातील कलम ८८ प्रमाणे चौकशी Inquiry व त्याबाबतची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.हा चौकशी अहवाल विभागीय सहनिंबधकांना सादर करण्यात येईल.अहवाल सादर झाल्यानंतर ६० दिवसात जबाबदारी निश्चित करणे अपेक्षित आहे,असे सांगितले जात आहे. त्यामुळे या निकालाकडे जिल्हयातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधले आहे.

जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या प्रकरणात काही आजी व माजी संचालक तसेच सेवकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चितीसाठी महत्त्वाची मानली जाणारी चौकशी सुरू आहे.

तत्कालीन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सहकार विभागाने सोपविली होती. ११ जानेवारीस याबाबतची या वर्षातील पहिली सुनावणी झाली.मात्र,आरोप ठेवण्यात आलेल्या आजी-माजी संचालकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वारंवार वेळ वाढवून मागितला.

सेवकांनी मात्र त्यांचे खुलासे तत्काळ सादर केले होते.करोना काळातील निर्बंधांमुळे सुनावणीचे कामकाज बंद असल्याने ही चौकशी लांबली होती. अखेर प्रदीर्घकाळ सुरू असलेली सुनावणीची प्रक्रिया गत आठवडयात पूर्ण झाली आहे.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर याचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रक्रिया मोठी असल्याने अहवाल सादर होण्यास विलंब होऊ शकतो. तयार अहवाल विभागीय सहनिंबधकांना सादर केला जाईल. त्यानंतर या प्रकरणी संबंधितांवर काय जबाबदारी निश्चित होते, निर्दोष ठरविले जाते, हे चौकशी अहवालाच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com