निमा व लायन्स क्लबचा 'हा' अभिनव उपक्रम

निमा व लायन्स क्लबचा 'हा' अभिनव उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Nashik Industries and Manufacturers Association) (NIMA) व लायन्स क्लब (Lions Club) यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस येथे ई-वेस्ट संकलन केंद्र (E-waste collection center) सुरू करण्यात आले.

यावेळी ई वेस्ट संकलन केंद्राचा (E-waste collection center) शुभारंभ मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar), पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Police Commissioner Ankush Shinde), निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आदींसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जागतिक पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच भविष्यातील पर्यावरणाचा (environment) विचार करून निमा व लायन्स क्लब यांनी हा निर्णय घेतला असल्याचे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.

उद्योजकांनी आपापल्या कारखान्यांतील ई-वेस्ट निमाच्या संकलन केंद्रात (E-waste collection center) जमा करावा असे आवाहनही निमा आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे, कामगार उपायुक्त विकास माळी, जिल्हा उदयोग केंद्र सहसंचालक शैलेंद्र राजपूत,

विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, मनपा विभागीय अधिकारी मयूर पाटील, ई वेस्ट संकलन केंद्राचे समनव्ययक सचिन शाह, विभागीय अध्यक्ष प्रविण जायकृष्णन, निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, मिलिंद राजपूत, हर्षद ब्राह्मणकर, मधुकर ब्राह्मणकर, मनिष रावल, सुधाकर बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com