बोलकी शाळा
बोलकी शाळा
नाशिक

जालखेड गावातील भिंती झाल्या बोलक्या...

'शाळा बंद, शिक्षण सुरू' अभिनव उपक्रम

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

'शाळा बंद, शिक्षण सुरू' या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सातत्य, सराव, दृढीकरण, स्वयं अध्ययनाला चालना देण्यासाठी" चला गावातील भिंती बोलक्या करूया" हा अभिनव उपक्रम जालखेड (ता.दिंडोरी) या गावात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली जालखेड गावात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ' बोलक्या भिंती 'चा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळेतील वर्गात पेट्या, कपाटे व इतर साहित्याची यादी करण्यात आली. यामध्ये चित्र तक्ते, वाचन कार्ड, स्वयंअध्ययन कार्ड, फ्लेक्स, अवांतर वाचन साहित्य गावातील भिंतीवर लावण्यात आले.

विद्यार्थ्यांना वाचनासाठी भाषा,गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास या विषयाचे मुबलक अध्ययन साहित्य उपलब्ध करण्यात आले,या वाचन कट्या चा उपयोग विद्यार्थी करू लागले असून वाचन झाल्यावर तक्त्यावरील माहिती लिहून ती वर्ग शिक्षकांना व्हाट्स अप च्या माध्यमातून पाठवत आहेत. गावातील सर्वसामान्य नागरिकही या वाचनकट्या जवळ थांबून वाचन करीत आहे. या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.

सरपंच सुरेश चारोस्कर यांनी बोलक्या भिंतीचा उपक्रम विद्यार्थ्यांना लाभदायक होत आहे,असे सांगितले. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ मोरे, पोलीस पाटील चिंतामण मोरे, शिक्षण विस्ताराधिकारी एस डी अहिरे, केंद्रप्रमुख मीरा खोसे यांनी या उपक्रमास भेट देऊन कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शिक्षकांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असे आवर्जून नमूद केले.

वउपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक लालजी बागुल, श्रवण भोये, संतोष चौरे, केदा चौधरी, अरुण तांबेकर, सुभाष कामडी, दिगंबर बादाड, छबिलाल कोळी, शैला होडगर, वैशाली देवरे यांनी परिश्रम घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com