नदीजोड योजनेत नाशिकवर अन्याय

आ. फरांदे यांचे जलसंपदामंत्र्यांना साकडे
नदीजोड योजनेत नाशिकवर अन्याय
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

दमणगंगा (Damanganga) (एकदरे) गोदावरी (godavari river) उपसा नदीजोड योजनेचे सर्वेक्षण व अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

या प्रकल्पातील पाच टीएमसी पाणी गंगापूर प्रकल्प समूहाऐवजी (Gangapur Project Group) पालखेड प्रकल्प समूहात (Palkhed Project Group) वळवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरासह (nashik city) परिसरावर अन्याय झाला आहे. याबाबत आ. देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांची भेट घेतली. नाशिकवर झालेल्या अन्यायाची त्यांना कल्पना दिली. याबाबत मंत्रालयात 24 मे रोजी बैठक आयोजित करण्याचे आदेश जयंत पाटील यांनी दिले.

गंगापूर प्रकल्प समूहातून प्रस्तावित किकवी प्रकल्पासह उपलब्ध होणारे सुमारे 9.5 टीएमसी म्हणजे सगळेच पाणी 2041 पर्यंत नाशिक शहराच्या वाढीव लोकसंख्येसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या प्रकल्पावरील संपूर्ण शेती व्यवसायासाठी तसेच प्रस्तावित औद्योगिक व्यवसायासाठी पाणी शिल्लक राहणार नाही. यामुळे नाशिकचा औद्योगिक विकास (Industrial development) खुंटणार आहे. दमणगंगा (एकदरे) गोदावरी उपसा नदीजोड योजनेचे सखोल सर्वेक्षण व अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 17,74,18,000 रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असे आ. फरांदे यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत (National Water Development Agency) तयार करण्यात आला असल्याचे समजते. सदर प्रकल्प अहवाल तयार करताना एकदरे योजनेचे 143 द.ल.घ.मी. म्हणजेच सुमारे पाच टीएमसी पाणी गंगापूर प्रकल्प समूहाऐवजी पालखेड प्रकल्प समूहात वळवणे प्रस्तावित केल्याचे समजते. सदर बाब ही गंगापूर प्रकल्प समूहावरील लाभधारकांवर अन्यायकारक आहे. गंगापूर प्रकल्प समूहातून प्रस्तावित किकवी प्रकल्पासह उपलब्ध होणारे सुमारे 9.5 टीएमसी म्हणजे सगळेच पाणी सन 2041 पर्यंत नाशिक शहराच्या वाढीव लोकसंखेसाठी आरक्षित करण्यात आले असून

या प्रकल्पावरील संपूर्ण शेती व्यवसायासाठी तसेच प्रस्तावित औद्योगिक व्यवसायासाठी पाणी शिल्लक राहणार नाही. प्रस्तावित दमणगंगा (एकदरे) गोदावरी उपसा नदीजोड योजनेद्वारे उपलब्ध होणार्‍या पाण्यामधून सिंचनासाठी 100 द.ल.घ.मी. (3.53 टीएमसी), घरगुती वापरासाठी 22 द.ल.घ.मी. (0.78 टीएमसी) व औद्योगिक वापरासाठी 21 द.ल.घ.मी. (0.74 टीएमसी) पाणी प्रस्तावित आहे. औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होणार्‍या पाण्यामधून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा प्रकल्प नाशिक शहरासाठी प्रस्तावित आहे.

याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थानिक जलसंपदा कार्यालयाशी व शासनाशी संपर्क करत आहे. पालखेड समूहात मांजरपाडा वळण योजनेचे पाणी वळवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिमेकडे दमणगंगा खोर्‍यात वाहून जाणारे सुमारे 1.5 टीएमसी पाणी गोळशी, महाजे, झार्लीपाडा, चिमनपाडा, हट्टीपाडा, ननाशी या योजनांद्वारे पालखेड समूहात वळवण्यात आले आहे. त्यामुळे पालखेड समूहात अतिरिक्त पाणी वळवणे शक्य होणार नसल्याची बाबही आ. फरांदे यांनी जलसंपदामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com