सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्यावतीने 155 किलो अन्नदान, प्रौढ, मानसिक व दिव्यांग मुलींसाठी कार्यरत असणाऱ्या पिंपळगाव बहुला येथील घरकुल परिवार संस्थाकडे सुपूर्त केले.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने सायकल-री-सायकल या उपक्रमाअंतर्गत आज वनवासी कल्याण आश्रम या संस्थेला गृही व कनाशी या सुरगाणा तालुक्यातील मुलींना शाळेत जाण्यासाठी, 10 सायकली सुपूर्त केल्या.

डॉ. भरत केळकर (अध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र) यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व सायकलिस्ट सदस्यांना गृहि येथील प्रकल्पास सायकलवर भेट देण्याचे आमंत्रण दिले, जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना सायकलिंगची प्रेरणा मिळेल.

अल्ट्रा सायकलिस्ट ओम महाजनच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल, नाशिक सायकलिस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकांचा संच ओम महाजनच्या हस्ते सुपूर्त केला. वनवासी कल्याण आश्रमला तीन प्रेरणादायी पुस्तकांचा सेट देण्यात आला.

तसेच माध्यमिक शाळा कोशिंबे, तालुका दिंडोरी या शाळेसाठी 41 पुस्तकांचा सेट संजय पवार यांच्याकडे सुपूर्त केला.

घरकुल परीवार संस्थेच्या संचालिका विद्या फडके यांनी नाशिक सायकलिस्ट परिवाराकडून, अत्यंत उपयोगी साहीत्य भेट मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले.

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी नाशिक सायकलिंस्टच्या विविध उपक्रमाची माहिती याप्रसंगी दिली.

या कार्यक्रमास सेक्रेटरी डॉ. मनीषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, डॉ. महेंद्र महाजन, किशोर माने, सुरेश डोंगरे, माधुरी गडाख, संजय पवार, शैलजा जैन, बलभीम कांबळे हे उपस्थित होते.