अन गावात अवतरले विठ्ठल, मायमावल्यांना दिली साडी चोळी

अन गावात अवतरले विठ्ठल, मायमावल्यांना दिली साडी चोळी

कळसुबाई मित्र मंडळाचा उपक्रम

इगतपुरी | Igatpuri

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्ताने घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या (Kalsubai Mitr Mandal) गिर्यारोहकांनी जंगलात २ किलोमीटर पायपीट केली.

गिर्यारोहकांनी रस्त्यात पाण्याने ओसंडून वाहत असलेले तीन मोठे नाले ओलांडले. करोना महामारीत (Corona Crisis) शासकीय योजनांपासून (Government Schemes) उपेक्षित असलेल्या इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) अतिशय दुर्गम भाग असलेल्या खैरेवाडीत (Khairewadi) गेले.

विठूरायाच्या (Vithuraya) पेहेराव्यात असलेल्या पुरुषोत्तम बोराडे या गिर्यारोहकाच्या हस्ते खैरेवाडीतील आदिवासी भगिनींना साडी, लुगडी व फराळाचे वाटप (Faral Distribution) करण्यात आले. बालगोपालांना खाऊचे वाटप करण्यात आले. गिर्यारोहकांनी टाळ मृदुगांच्या गजरात विठोबारायांच्या नामाचा जागर केला.

या भक्तिमय वातावरणात विठोबाराय साक्षात दर्शन देऊन आदिवासी बांधवांच्या मदतीला आल्याचा आभास आदिवासी भगिनी, बांधवांना झाला. कु. साक्षी आरोटे हिने भक्तिगीते गाऊन प्रसन्नमय वातावरण निर्माण केले.

धार्मिक सेवाभावी संस्थानी, राजकीय पक्षांनी व इतर मंडळानी कोविड काळात असे मदतीचे कार्यक्रम राबवावे असा संदेश समाजाला देण्यासाठी व गरजू लोकांना मदत करून कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी जनजागृती केली. अनोख्या पद्धतीने देवशयनी आषाढी एकादशी अतिशय दुर्गम भागात उत्साहात साजरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com