‘नवीन नाशिक’ नावासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार

‘नवीन नाशिक’ नावासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार

नवीन नाशिक | निशिकांत पाटील | New Nashik

नाशिकच्या (Nashik) विकासात सर्वात मोठी भर पडली ती म्हणजे सिडकोच्या (cidco) वसाहतीची आणि जसा सिडकोचा उदय झाला तसा नाशिकमध्ये सिडकोकडे बघण्याचा दृष्टिकोन नाशिककरांचा वेगळा असल्याने सिडकोला खर्‍या अर्थाने न्याय देण्याकरिता दैनिक ‘देशदूत’ने 2005 सालामध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपिठाचे शिल्पकार गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सिडकोचे नामकरण हे नवीन नाशिक (New Nashik) असे केले आणि आता प्रभाग क्रमांक 29 मध्ये आय लव न्यू नाशिक (I Love New Nashik) असा सेल्फी पॉइंट भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी उभारला...

सिडको प्रशासनाने अंबड औद्योगिक वसाहत व सातपूर औद्योगिक वसाहत यांच्या मधोमध सर्वसामान्य कामगारांना परवडेल अशा दरात एक गृहनिर्माण योजना राबवून घरे उपलब्ध करून दिली. त्यानंतर फक्त कामगार वसाहत म्हणूनच सिडको परिसराची ओळख होती व सिडकोकडे बघण्याचा नाशिककरांचा दृष्टिकोन हा वेगळा होता, ही बाब लक्षात घेऊन दैनिक ‘देशदूत’ने सिडकोचे नामकरण नवीन नाशिक असे केले.

सिडको महानगरपालिकेचे नाव बदलून नवीन नाशिक महानगरपालिका असे ठेवण्यात आले व मंत्रालयातील गॅझेटमध्येदेखील नवीन नाशिक असे नाव सिडको परिसराला देण्यात आले. आता लोकांनीदेखील नवीन नाशिक हे नाव स्वीकारावे, यासाठी प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आग्रही भूमिका घेत आय लव यू न्यू नाशिक असा सेल्फी पॉइंट महाकाली चौकात म्हणजेच नवीन नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवला. यामुळे या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी नवीन नाशिककर गर्दी करत असताना दिसून येत आहेत.

आता नवीन नाशिक ही भलीमोठी बाजारपेठ देखील झालेली आहे. मोठे उद्योगधंदे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत, तर शिवाजी चौक शॉपिंग सेंटरसारख्या परिसरामध्ये शेतकरी स्वतःहून आपला शेतमाल विकत असल्याने नाशिक शहरात भाजी विक्रेत्यांना जाण्याची गरज भासत नसल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी कपडे खरेदी असो किंवा अन्य घरातील खरेदी असो सिडकोवासियांना नाशिक शहरात जावे लागत होते, मात्र आता रास्त दरात या ठिकाणी कपड्यांपासून सर्व जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. चित्रपटगृहांसाठी पूर्वी नाशिकमध्ये जावे लागत होते. नवीन नाशिकची ओळख आता खर्‍या अर्थाने नवीन नाशिक म्हणून होत असल्याचे दिसून येत आहे.

‘देशदूत’कडून पाठपुरावा

‘सिडको’चे ‘नवीन नाशिक’ नामकरण होण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना अखेर यश आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com