दारूड्या पित्याची मुलांना अमानुष मारहाण

चाईल्ड लाईन, पोलीसांकडून सुटका
दारूड्या पित्याची मुलांना अमानुष मारहाण

नाशिक । Nashik

मद्याच्या नशेत (Intoxicated) पोटच्या मुलांना अमानुष मारहाण (Inhuman beating of children) करणार्‍या पित्याच्या तावडीतून दोन मुलांची सुटका (Two children released) करण्यात आल्याची कारवाई जेलरोउच्या कॅनालरोड (Jailroad) परिसरात नवजीवन चाईल्ड लाईन (Navjivan Chaild Line) या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. तर निष्ठूर पित्यविरूध्द गुन्हा दाखल(Case Filed) करण्यात आला आहे.

अतुल दिलीप कर्डक (रा.कॅनोल रोड जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत पित्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार कॅनोल रोडवरील गौरी कमल सोसायटी(Gauri Kamal Sociaty) भागात राहणारा एक व्यक्ती आपल्या मुलांना अमानुष मारहाण करीत असल्याची माहिती नवीन नाशिक (Navin Nashik) येथील नवजीवन चाईल्ड लाईन संस्थेत मिळाली होती.

त्यानुसार रविवारी (दि.4) संस्थेच्या संचालकांनी पोलीसांसमवेत (Nashik Police) घटनास्थळी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला होता. संशयीत आापल्या सात वर्षीय मुलासह चार वर्षीय मुलीस बेदम मारहाण करीत होता.

या घटनेत मुलाच्या डोळ्यास आाणि मुलीच्या पायास गंभीर दुखापत (Serious injury) झालेली असतांना तो अमानुष मारहाण करीत होता. पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेत मुलांची बापाच्या जाचातून सुटका केली असून त्यांची रवानगी उंटवाडी (Untwadi) येथील निरीक्षण गृहात(Observation house) करण्यात आली आहे.

याप्रकरणी चाईल्ड लाईनचे विजय माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आाबा मुसळे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com