जिल्हा बँकेच्या 'इतक्या' आजी-माजी संचालकांची एसीबीने मागविली माहिती

जिल्हा बँकेच्या 'इतक्या' आजी-माजी संचालकांची एसीबीने मागविली माहिती

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nashik District Central Cooperative Bank) अंतर्गत कर्जाचे बेकायदेशीर वितरण, खरेदी, नोकर भरती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणाच्या चौकशीला पोलिस महासंचालकांनी (Director General of Police) परवानगी दिली आहे...

त्यानुसार बँकेच्या २९ आजी-माजी संचालकांच्या चौकशीला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ANTI CORRUPTION BUREAU) चौकशीला सुरूवात झाली आहे. एसीबीकडून जिल्हा बँक (District Bank) तसेच सहकार विभागाला पत्र पाठवण्यात आले असून या संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सहकार विभाागाने (Cooperation Department) सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश मोहीते (Social worker Dr. Girish Mohite) यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा बँकेच्या २९ आजी-माजी संचालकांच्या चौकशीला हिरवा कंदील दर्शवला होता. सहकार पणन व वस्रोद्योग विभागाने बँकेचे संचालक मंडळ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम २ (क) नुसार लोकसेवक संज्ञेत मोडत असल्याने चौकशीला परवानगी दिली होती.

त्यामुळे संचालक मंडळाच्या कोणत्याही सदस्याविरुध्द आरोप असलेल्या गुन्हयाची भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम १७ अ नुसार चौकशीस हरकत नसल्याचे पत्र एसीबीला (ACB) सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार नाशिक एसीबीने (ACB Nashik) आता मुंबईतील लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती. त्याला महासंचालकांनी गत आठवडयात मंजूरी दिली होती. त्यामुळे एसीबीने आता या आजी-माजी २९ संचालकांच्या गैरकारभाराच्या चौकशीला प्रारंभ केला आहे.

एसीबीने सहकार निबंधक (Registrar of Co-operatives) तसेच जिल्हा बँकेला पत्र पाठवत,या संचालकांवर असलेल्या आरोपांबाबतची संपुर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.यानुसार सहकार विभाग तसेच जिल्हा बँकेने या बाबतची माहितीची जमवाजमव सुरू केली आहे. ही माहिती आठ दिवसात एसीबीला सादर केली जाणार आहे.त्यानंतर या आजी - माजी संचालकांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आजी-माजी संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com