प्रदर्शनातून विकासकामांची माहिती : भोकनळ

प्रदर्शनातून विकासकामांची माहिती : भोकनळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाकाळात ( Corona )सगळे बंद असताना महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aaghadi Government )आपल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवून जनतेची सेवा केली आहे. करोनाकाळात प्रत्येक व्यक्तीला कशाची कमतरता भासू शकते, याचा बारकाईने अभ्यास करुन योजनेच्या माध्यमातून ती मदत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसून येते, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ (Arjuna Award winner Dattu Bhokanal )यांनी प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी व्यक्त केली आहे.

मीडिया सेंटर, बी. डी. भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी’ ( Don Varshe jansevechee)ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शन गेल्या पाच दिवसापासून सुरु आहे. या प्रदर्शनाचा समारोप अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती सहायक किरण डोळस, प्रदर्शन सहायक संजय बोराळकर आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ पुढे म्हणाले की, करोनाकाळात शासनाने व प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा या प्रदर्शनाच्या माध्यमातून समजला. शासनाने कोरोनाकाळात कुणाला आरोग्य सुविधा कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करुन महाराष्ट्राने स्वयंपूर्णते कडे वाटचाल केली आहे. तसेच कृषी व इतर आवश्यक बाबीचींही पूर्तता केली असल्याचे प्रदर्शनातून दिसून आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com