आयुक्तांच्या तंबीनंतर माहिती उपलब्ध

आयुक्तांच्या तंबीनंतर माहिती उपलब्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य निवडणूक आयोगाच्या ( State Election Commission )निर्देशानुसार नाशिक महापालिका येत्या 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना ( Ward Structure ) जाहीर करणार आहे. त्याच्या तयारीला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण सुमारे 10 हजार अधिकारी व सेवक लागणार आहे.

यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे 400 संस्थांना आपल्याकडील मनुष्यबळाची यादी देण्याची सूचना केली होती, तरी अनेकांनी माहिती पुरवली नव्हती, म्हणून मनपा आयुक्तांनी माहिती न देणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मनुष्यबळाची माहिती महापालिकेकडे उपलब्ध झाली आहे.

पहिले करोना ,त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे लटकलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. येत्या 17 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.यामुळे प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरू झाले आहे.

निवडणुकीसाठी राखीव धरून एकूण सुमारे दहा हजार अधिकारी व सेवकांची गरज लागणार असल्यामुळे महापालिकेने विविध संस्थांना पत्र देऊन आपल्याकडील मनुष्यबळाची माहिती मागवली होती.

यामध्ये सुमारे 100 संस्थांनी माहिती दिली नव्हती, त्यांना नोटीस पाठवून माहिती सादर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी दिला होता. त्यानुसार आता माहिती मिळाली आहे.

यंदा नाशिक महापालिकेत 11 नगरसेवकांची वाढ होणार आहे. मात्र करोनामुळे यंदा राष्ट्रीय जनगणना झाली नसल्यामुळे 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे पंधरा लाख 84 हजार लोकसंख्या गृहीत धरून महापालिका निवडणुकीचे नियोजन प्रशासन करीत आहे. तरीही मतदार यंदा वाढणार आहे.

Related Stories

No stories found.