सावधान ! चिकनगुनिया डोके वर काढतो आहे

सावधान ! चिकनगुनिया डोके वर काढतो आहे

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

करोनाची साथीने (Corona Crisis) थैमान घातल्यानंतर आता डेंग्यू(Dengue), चिकनगुनियाच्या (Chikanguniya) साथीनेही डोके वर काढण्यास सुरू केले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही (In Rural Areas) या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

त्र्यंबक तालुक्यातील (Trimbak Taluka) विविध भागांत चिकणगुनियाचे रुग्ण आढळत असून दवाखान्यात गर्दी (Crowd At Hospital) वाढू लागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गवत, अस्वच्छता यामुळे डास तयार होत आहेत. त्यामुळे चिकनगुनिया हा आजार बळावतो आहे. यामुळे आरोग्याला हानी पोहचत असून ग्रामस्थ चिकणगुनियाला बळी पडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी भागात चिकणगुणिया हातपाय पसरतो आहे.

पावसाळ्यात सांडपाणी, गवत, अस्वच्छता यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, ताप आदी आजार बळावतात. तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने सगळीकडे गढूळ पाणी वापरात येत असून यामुळे डास वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे इतरही आजारांना आमंत्रण याद्वारे दिले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी तसेच साठवलेले पाणी हे व्यवस्थित रित्या ठेवणे आवश्यक असून लोकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.