निकृष्ट बियाणांमुळे टोमॅटो उत्पादक हैराण

निकृष्ट बियाणांमुळे टोमॅटो उत्पादक हैराण

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

आज टोमॅटोला (tomato) साधारणत: चांगला बाजारभाव (market price) मिळत आहेत. अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हैराण झालेले शेतकरी (farmers) अस्मानी संकटात सापडले असतांनाच

बेहेड येथील शेतकर्‍यांना बियाणे पुरवठा (Supply of seeds) करणार्‍या कंपनीच्या बोगस व निकृष्ट प्रतीच्या बियाणांमुळे शेतकरी हैराण झाले आहे. त्यामुळे हे बियाणे कंपनीने शेतकर्‍यास 1 लाख रु. नुकसान भरपाई (compensation for damages) द्यावी अशा मागणीचे निवेदन (memorandum) शेतकर्‍यांच्या वतीने गटविकास अधिकारी सदीप कराड (Group Development Officer Sadeep Karad), कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर (Agriculture Officer Balasaheb Khedkar) यांना देण्यात आले आहे.

येथून तीन कि.मी. अंतरावरील बेहेड येथील 50 हून अधिक शेतकर्‍यांनी ‘कॅलयुस 35’ हे टोमॅटोचे बियाणे (Tomato seeds) खरेदी केले होते. या वाणाची रोपे शेतात लावली परंतू निकृष्ठ टोमॅटोची झाडे मोठी झाल्यावर त्यांना फुल आणि त्यानंतर फळधारणा अपेक्षेप्रमाणे झाली नाही. टोमॅटोला जी फळे लागली त्यांना मोठ्या प्रमाणात तडे जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍याच्या मालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही.

यामुळे टोमॅटोच्या दराला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आतापर्यंत टोमॅटो पिकांवर (tomato crop) खते, कीटकनाशके, औषधे यांचा खर्च फिटण्याची पंचाईत झाली त्यामुळे येथील शेतकर्‍यांनी दयनीय स्थिती समजताच येथील भाजपचे सतीश मोरे, बापू पाटील, प्रशांत घोडके यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेहेड येथे धाव घेऊन पिकाची पाहणी केली व त्यानंतर निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देवून प्रत्येकी शेतकरी 1 लाख रु. नुकसान भरपाई अशी मागणी करण्यात आली.

या निवदेनावर अशोक भवर, विक्रम परदेशी, दत्तात्रय भवर, मुकुंद जाधव, संकेत जाधव, सोमनाथ भवर, श्याम रहाणे, धनंजय रहाणे, राहुल भवर, मनोज भवर, संतोष भवर, अभिजित परदेशी, शिवाजी भवर, दिनकर भवर, सूरज भवर, राकेश जाधव, विलास जाधव, मुकंद जाधव, संकेत जाधव, योगेश भोसले, खंडू गवळी, विक्रम आदींसह बेहेड परिसरातील 50 हून अधिक शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com