स्टाइसला 'इतकी' एकर जमीन देण्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

स्टाइसला 'इतकी' एकर जमीन देण्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंडिया बुल्स कंपनीच्या (India Bulls Company) 250 एकर जमीन स्टाइसला (STICE) मिळावी, स्टाइसला दररोज 2500 घनमीटर पाणी आणण्यास परवानगी मिळावी आदींसह विविध मागण्या स्टाईच्या शिष्टमंडलाने उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांच्याकडे केल्या आहेत.

या मागण्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी दिले. खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्यापूढाकाराने स्टाइसचे अध्यक्ष नामकर्ण आवारे (Namkarna Aware, President of STICE) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन उद्योजकांच्या प्रलंबित विवीध मागण्यांत्यांच्या निदर्शनास आणून दिल्या यावेळी उद्योगमंत्री सावंत यांनी सचिवांना संबंधित विषय तातडीने मार्गीलावण्याचा सूचना दिल्या.

स्टाइसमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक असून त्यासाठी जमीन कमी पडत आहे. मुसळगाव-गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स (India Bulls) सध्याची रतन इंडिया कंपनी (Ratan India Company) व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) यांचे संयुक्त सेझमधील 250 एकर जमीन यासंस्थेच्या विस्तारासाठी भाडेपट्ट्याने मिळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नाशिक (nashik) व मुंबई (mumbai) कार्यालयाकडे दाखल केलेला आहे.

त्याप्रस्तावाप्रमाणे 250 एकर जमीन संस्थेच्या नावे 99 वर्षांच्या भाडेपट्टयाने मिळावी, अशी मागणी उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे केली.यावेळी संस्थेचे संचालक विठ्ठल जपे, नीलकमल कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट दिनकर कठाडे हे उपस्थित होते.

इंडिया बुल्स व सध्याचे रतन इंडिया, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा संयुक्त सेझच्या क्षेत्रातील उद्योगासाठी माळेगाव ते गुळवंचपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम होती घेणार आहे. सदरची पाइपलाइन टाकण्याची योजना तयार करताना सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीस प्रतिदिनी 2500 घनमीटरपाण्याचा पुरवठा नियोजित पाइपलाइनमधून करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी मागणी उद्योजकांनी यावेळी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com