उद्योगक्षेत्राची चाके आजपासून गतिमान

उद्योगक्षेत्राची चाके आजपासून गतिमान

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

दिवाळीनिमित्त (Diwali) गुरुवारपासून उद्योगांना (Industry) तीन दिवसांच्या सुट्या जाहीर झाल्या होत्या. त्यातील मोठ्या कंपन्यांच्या शिफ्ट रविवारपासूनच सुरू झाल्या. अनेक कामगारांनी (Workers) जोडून रविवारची सुटी घेतल्यामुळे आजपासून खर्‍या अर्थाने उत्पादनाला पूर्णवेळ सुरुवात झाली आहे...

नाशिकमधील उद्योगक्षेत्र ऑटोमोबाईल (Automobile) आणि इलेक्ट्रिकल (Electrical) उद्योगावर अवलंबून आहे. मोठ्या उद्योगांंवर लघु, मध्यम उद्योगांंचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे मोठ्या उद्योगांसोबतच त्यांचीही उद्योगचक्रे फिरती झाली आहेत.

प्रत्यक्षात दिवाळीनिमित्त गुरुवार (दि.4) पासून शनिवार(दि.6)अशा तीन दिवस सुटी दिल्याने मोठ्या कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवले होते. या कंपन्यांनी रविवारी सकाळपासूनच उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्या. त्यामुळे या कारखान्यांचे कामगारही कामावर परतले आहेत.

सातपूर-अंबडसह (Satpur-Ambad) जिल्हाभरात सुमारे 15 हजार 600 उद्योग आहेत. त्यात 246 मोठे उद्योग आहेत. मोठ्या उद्योगांमध्ये बहुतांश ठिकाणी सतत प्रक्रिया केली जाते. त्याचवेळी उद्योगांच्या माध्यमातून विविध औद्योगिक उत्पादनांवर प्रक्रिया करणारे लघू, मध्यम उद्योगांंनी कामगारांना तीन ते पाच दिवस सुटी दिली आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया काही अंशाने ढेपाळलेली असेल, मात्र सोमवारपासून सर्वच उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने उत्पादनांना पुन्हा गती मिळाली आहे.

सुटीत यंत्रांच्या दुरुस्तीला वेळ

मोठ्या उद्योगांमध्ये वर्षभर 24 तास यंत्रांवर काम केले जात असल्याने उत्पादन प्रक्रिया खंडित करता येत नसल्यामुळे यंत्रांच्या दुरुस्तीला वेळ मिळत नाही. दिवाळीच्या सुटीच्या काळात सलग तीन दिवस कारखाने बंद राहत असल्याने यंत्रांची देखगाल दुरुस्ती करण्याची संधी मोठ्या उद्योगांना मिळत असते. या काळात यंत्रांच्या लहान मोठ्या दुरुस्त्या करून सुटे भाग बदलण्यासाठी मेन्टेनन्स विभाग दिवाळीत कार्यरत होते.

पोलिसांमुळे उद्योग क्षेत्र सुरक्षित

चार ते पाच वर्षांपूर्वी उद्योग क्षेत्रात दिवाळीच्या काळात हमखास चोर्‍या होत होत्या. मात्र पोलीस प्रशासन उद्योजक व सुरक्षा रक्षक एजन्सीज यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या मंथनानंतर पोलिसांनी उभारलेल्या चोख बंदोबस्तामुळे उद्योग क्षेत्राची सुटी कोणत्याही दुर्घटनेशिवाय निर्विघ्नपणे पार पडल्याने उद्योजकांनी पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com