इंदूरला खून करून फरार असलेल्या आरोपीस नाशकात बेड्या

इंदूरला खून करून फरार असलेल्या आरोपीस नाशकात बेड्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesg) इंदूर (Indore) येथून खून (Murder) करून फरार झालेल्या आरोपीस उपनगर पोलिसांनी (Upanagar police) जेलरोड येथील नारायण बापू नगर येथे शिताफीने सापळा रचून अटक केली. संशयित आरोपीला अटक केल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथे खून करून फरार असलेला संशयित आरोपी जेलरोड (Jailroad) येथील नारायण बापूनगरमध्ये येणार रस्त्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार सुदर्शन बोडके यांना समजली.

त्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार बोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोडसे, हवालदार ताजने, शेख, मढवई व इतरांनी सापळा रचला.

यावेळी एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या आडोशाने पुढे येत होता. हा व्यक्ती पोलिसांना (Police) दिसताच त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली मात्र तो माहिती देत नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला शिताफीने अटक (Arrested) केली.

त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे नाव सिद्धार्थ सुनील सिंग राठोड (29 रा. इंदूर, मध्यप्रदेश) येथील असल्याचे सांगितले. तसेच त्या भागात असलेल्या एरोड्रोम पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा गुन्हा करून पळून आला आहे असेही पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.

यानंतर उपनगर पोलिसांनी इंदूर पोलिसांशी संपर्क साधून फरार असलेल्या आरोपीबाबत माहिती दिली. त्यानंतर इंदूर पोलिसांचे एक पथक आले व संशयित खुनातील आरोपीला उपनगर पोलिसांच्या ताब्यातून घेऊन गेले.

उपनगर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.