ग्रामीण भागात ऑक्सिजन टाक्यांबाबत उदासीनता

ग्रामीण भागात ऑक्सिजन टाक्यांबाबत उदासीनता
USER

नाशिक | Nashik

करोनाबाधितांसाठी (Corona Patients) ऑक्सिजन (Oxygen) त्वरीत मिळावा यासाठी जिल्ह्यात एकूण ३२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, प्रत्यक्षात जिल्हा शासकीय रुग्णालय (Nashik Civil Hospital) वगळता इतर ३१ ठिकाणचे प्लांटचे कामकाज सुरु झालेले नाही किंवा अपूर्ण आहे. त्यामुळे एकंदरीत ग्रामीण भागात (In Rural Areas) ऑक्सिजन टाक्यांबाबत उदासीनता (Indifference) दिसून येत आहे.

करोनाबाधित रुग्णांची तब्येत खालावल्यास त्यांना कृत्रिम प्राणवायू (Artificial oxygen) आवश्यक असतो. करोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) ऑक्सिजन अभावी अनेक कोरोनाबाधितांचे मृत्यू (Corona Patient's Death) झाले.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (Lack Of Oxygen) रुग्णांच्या नातलगांना धावपळ करावी लागली होती. ही बाब ओळखून प्रशासनाने रुग्णालयातच कायमस्वरुपी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. आणि सेंट्रल ऑक्सिजन लाईन (Center Oxygen Line) टाकण्यासाठी सुरुवात केली. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात २० केएल क्षमतेची टाकी बसवण्यात आली. त्यातून रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) सुरळीत सुरु आहे.

मात्र, जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात काही प्रस्तावित असलेले ऑक्सिजन प्लांटचे काम अपुर्ण आहे तर काजी ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागांमध्ये अद्यापही धोका कायम असणार आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात झाले आहेत. मात्र तेथीलच ऑक्सिजन प्लांटचे काम पुर्ण न झाल्याने भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ऑक्सिजन नसल्यास रुग्णांना शहरातील रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याने शहरातही खाटांची कमतरता भासते. त्यामुळे ग्रामीण भागातच सर्व सुविधा पुरवल्यास रुग्णांचा जीव वाचवण्यासोबतच प्रशासनावरील ताणही हलका होण्यास मदत होणार आहे.

१२ प्रास्तावित ठिकाणचे साहित्य आले असून १२ ठिकाणचे साहित्य येत्या १० दिवसांत येण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणी करून त्यानंतर चाचणी केल्या जातील. तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट सुरु होण्याची शक्यता आहे.

- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com