लॉजिस्टिक पार्क उभारणीचे संकेत; शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित

लॉजिस्टिक पार्क उभारणीचे संकेत;  शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या (Niphad Cooperative Sugar Factory) मालकीच्या 108 एकर जागेवर नियोजित मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (Multi Model Logistics Park) होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसह उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

2016 साली देशाचे तत्कालीन रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक येथे ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली. कारखान्याच्या जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार होता. निफाड साखर कारखान्याकडील थकीत रक्कम वसूल करण्याकरिता नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने या कारकान्याची मालमत्ता ताब्यात घेतलेली आहे.

या कारखान्याच्या एकूण क्षेत्रापैकी काही जमीन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई (जेएनपीटी) या संस्थेने अधिग्रहित करण्याचे ठरवले असून, या जमिनीचे मूल्यही निश्चित करण्यात आले आहे. सन 2018 मध्ये असलेली जमीन जेएनपीटीने हस्तांतरित करणे गरजेचे होते.मात्र त्यानंतरकेंद्र सरकारकडून या प्रकल्पावर कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने हा प्रकल्प मागे पडला होता.

ड्रायपोर्टला परवानगी मिळत नसल्याने मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी)च्या माध्यमातून ड्रायपोर्टचे कामकाज गतीमान करण्यासाठी आ. दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar )यांनी पाठपूरावा केला. त्यानुसार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्याकडून लवकरच याबाबत कार्यवाही होणार असल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com