आधारला मोबाईल नंबर लिंक करायचाय? मग नाशिकच्या पोस्टमन काकांना भेटाच...

आधारला मोबाईल नंबर लिंक करायचाय? मग 
नाशिकच्या पोस्टमन काकांना भेटाच...

नाशिक| प्रतिनिधी Nashik

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेत आता (India post payment bank) द्वारे पैसे पाठवण्यासाठी (Money Transfer), देयक भरणा, आरटीजीएस (RTGS) तसेच जर तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असेल तर तुम्ही आधार एईपीएस (Aeps) सेवेद्वारे कोणत्याही बँकचे पैसे पोस्टमन, डाक सेवक किंवा आपल्या जवळ असलेल्या पोस्ट ऑफिस मधून काढु शकतात अशी सुविधा करून देण्यात आली आहे....

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक ही लोकाभिमुख बँक असुन प्रत्येक व्यक्ति पर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात डाक विभागाने घरपोच अदा केले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक डाक विभागाने पोस्टमन/ डाक सेवक यांच्या माध्यमातून विभागातील सर्व डाक कार्यालयातून UIDAI च्या CELC App द्वारे आधारला मोबाईल क्रमांक EMAIL ID अद्ययावत करण्याची सुविधा सुरु केली असून नागरिकांना घरपोच आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि.२३.०८.२०२१ ते दि.२८.०८.२०२१ दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या सोयीमुळे नागरिकांना घरपोच त्यांच्या आधारला मोबाईल क्रमांक EMAIL ID लिंक / अपडेट करता येणार आहे.

किंवा पूर्वीचा मोबाईल क्रमांक बदलून घ्यावयाचा असल्यास तो देखील बदलून घेता येईल. त्यासाठी मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष / सेक्रेटरी त्यांच्या सर्व रहिवाशांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस लिंकिंगसाठी त्यांच्या पोस्टमनला भेटू शकतात व ह्या विशेष मोहिमेदरम्यान सर्वांचे आधार-मोबाईल लिंक करून घेऊन शकतात.

याबरोबरच इतर मोठ्या अस्थापना/ कार्यालये इ.चे प्रमुख देखील त्यांच्या कर्मचार्यांसाठी एकत्रितपणे सर्वांचे आधार-मोबाईल अपडेट करून घेण्यसाठी जवळच्या पोस्टऑफिस किंवा पोस्टमन यांना संपर्क करू शकतात.

म्हणून आधारला मोबाईल क्रमांक लिंक आवश्यक...

१. आधारला मोबाईल लिंक असल्याने इतर कुणी आपल्या आधारच्या माहितीचा दुरुपयोग करू शकत नाही, कारण त्याची अद्ययावत माहिती लगेच आपल्या मोबाईलला येते, त्यामुळे आपली फसवणूक होत नाही.

२. आधारमध्ये बरेचशे बदल आधार OTP ने स्वतःच ऑनलाईन करून घेणे शक्य होते.

३. PAN कार्ड, Driving License, Passport इ. काढण्यासाठी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे

४. शासनाच्या बऱ्याच योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असते. जसे कि विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरणे,प्रधान मंत्री किसान योजनेचे अनुदान, रिक्षा धारकांचे अनुदान, किंवा भविष्यात येऊ घातलेल्या इतर योजना इ.

५. EPFO च्या सर्व सदस्यांना त्यांचे UIN (EPF खाते) आधारला लिंक करावयास सांगितले आहे आणि ते करण्यासाठी आधी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी साठी आयपीपीबीच्या www.ippbonline.comया संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

तरी नाशिक विभागातील सर्व जनतेने जवळच्या पोस्ट ऑफ़ीसशी अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा व या सेवेचा ह्या विशेष मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रवर अधिक्षक मोहन शंकर अहिरराव यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com