स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस
नाशिक

नाशकातील विविध शाळांत स्वातंत्र्यदिन उत्साहात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

जिल्ह्याभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून शहरातील अनेक शाळांत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

पुष्पावती व जु.स.रुंगटा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक येथील पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालय व जु.स.रुंगटा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन शासकीय नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला.

पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर मान्यवरांनी भारत मातेचे पूजन केले. मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर यांनी आपल्या संदेशात जगावर तसेच भारतावर कोव्हीडचे संकट आले आहे. त्यामध्ये समर्थपणे कार्य करणाऱ्या योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या यशस्वी प्रयत्नातून आज आपण या संकटावर मात करत आहोत. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण हे उद्याच्या पिढीसाठी आत्मनिर्भर करणारे आहे असे सांगितले.

न्यू मराठा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिकदृष्ट्या अंतर पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला. न्यू मराठा हायस्कूल प्रांगणातील ध्वजारोहण शालेय समितीचे सदस्य श्री. रमेश नथुजी येवले यांच्या हस्ते करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण गूगल मीटद्वारे करण्यात आले. त्या उपक्रमाचे पालक, विद्यार्थी यांनी कौतुक केले.

हिरे विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात

आदिवासी सेवा समिती नासिक संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, सावता नगर, सिडको विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनिल इंगळे होते. मा. अध्यक्षांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर विद्यालयातील मार्च २०२० परीक्षेत प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. नंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पृथ्वीराज मगर यांनी उपस्थितांना "तंबाखू मुक्त शपथ" दिली.

अभिनव बाल विकास मंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड नाशिक या शाळेत ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.

करोना योद्धा म्हणून एक महिन्यापासून कार्यरत असलेल्या शाळेतील उपशिक्षिका संगीता बोरसे यांचा सन्मान म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, ध्वज प्रतिज्ञा व समूहगीत घेण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे घरूनच स्वातंत्र्यदिन साजरा केला.

उपशिक्षिका अनिता वाघ यांनी स्वातंत्र्यदिनाची माहिती सांगितली तसेच मंगला गुळे यांनी सूत्रसंचलन केले. शालेय समिती सदस्य डॉ. अशोक देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मखमलाबाद मविप्र संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अभिनव बालविकास मंदिर, होरायझन स्कुल अॅकेडमी, कला व वाणिज्य महाविद्यालय, मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात शासकिय नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावून साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमापुजन व सरस्वतीपुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मविप्र संचालक सचिन पिंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संगीतशिक्षक टी.एन.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे सचिन पिंगळे यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com