नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
नाशिक

नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राज्याचे अन्न, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक : करोनाच्या संकट काळात शासन, प्रशासन आणि नागरिकांचा पुढाकार कौतुकास पात्र आहे. त्यामुळेच कोरोनाचा संकट काळ हा आपणा सर्वांसाठी स्वावलंबी व सशक्त बनण्याची संधी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे उपस्थित होते.

आज सर्व भारतीयांच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यातुन आपला महाराष्ट्र, आपला जिल्हाही या आपत्तीच्या सावटाखाली आहे. संकट भले कितीही मोठे असो आपण सर्वजण जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून त्याचा एक दिलाने सामना करु.

तसेच देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग आपल्या क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी बांधला होता तसाच संकल्प आज देशाला, राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करुया असे आवाहन, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जनतेला संबोधित करत असतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना तितक्याच झपाट्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही लक्षणीय आणि आशादायी आहे.

त्यात आपल्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांचे अहोरात्र परिश्रम आहेत. त्यातील अनेकांना कर्तव्यावर असताना कोरोनाची बाधा झाली. त्यात पोलीस यंत्रणा व आरोग्यकर्मी अत्यंत जोखीमेच्या शीर्षस्थानी आहेत. कोरोनाशी लढतांना जीव गमवलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना दु:ख पचवण्याची व पुन्हा नव्याने आयुष्याची सुरूवात करण्याची क्षमता, बळ मिळो, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.

उपचाराबरोबरच इतर आवश्यक बाबींची शाश्वत साखळी निर्माण करण्यात यश

उपचाराबरोबरच निरनिराळ्या पातळीवरील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, अन्नधान्य वाटप, कृषी व त्यासंबंधीत जीवनावश्यक बाबी, उद्योग, औषध पुरवठा, कोरोना चेक पोस्ट, उद्योग परवाने आणि अन्नदानाची एक शाश्वत साखळी निर्माण करण्यात यश प्राप्त झाले आहे. या सर्व प्रक्रीयेत जनतेचा आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

त्यामुळेच संकट काळात गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी 159 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 17 लाख 53 हजार 545 अन्न पाकीटांचे वाटप करून अन्नदान करू शकलो. त्याचप्रमाणे या कालावधीत 98 हजार 827 अन्न धान्याचे कीट व जीवनावश्यक वस्तू, 91 हजार 676 किलो धान्य, तसेच 1 लाख 13 हजार 524 मास्कचे वाटप करून शासन व प्रशासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या कामाला हातभार लावला असल्याचे , पालकमंत्री भुजबळ म्हणाले.

पुरवठा विभागामुळे टळली उपासमार

या संकट काळात कोणीचीही उपासमार होऊ नये यासाठी पुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय योजनेंतर्गत 76 हजार 519 मे. टन गहू व तांदुळाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 71 हजार 512 मे. टन गहू व 6 हजार 531 मे. टन तांदुळाचे वाटपाबरोबरच ​केशरी शिधापत्रिका धारकांना 7 हजार 467 मे. टन गहू व 4 हजार 826 मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. आत्मनिर्भर विनाशिधापत्रिका धारक योजनेंतर्गत मे व जून 2020 या कालावधीत 1 हजार 934 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे.

कुणाचीही उपासमार होणार नाही या एका ध्यास आणि संकल्पाने राज्याचा अन्न, नागरी पुरवठा विभाग काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून शिवभोजन योजनेचा 26 जानेवारी 2020 प्रारंभ करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात 44 शिवभोजन केंद्रामार्फत आतापर्यंत 6 लाख 58 हजार 941 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.

करोना संकटात संपूर्ण शेती अनलॉक

करोना संकटात संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेती मात्र अनलॉक होती. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आणि शेती अडचणीत येणार नाही यासाठी शासन वचनबद्ध आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पीककर्ज योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत खरीप हंगामासाठी 52 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 362 कोटींचे रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 58 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 32 हजार 721 दशलक्ष घनफुट असून 50 टक्के इतका आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात एकूण 5 लाख 69 हजार 313 हेक्टर क्षेत्रात 85 टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. संकटे कितीही आली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी याप्रसंगी दिली आहे.

उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सत्कार

पोलिस विभागात कर्तव्यावर असताना उत्तम प्रकारे कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे...

हे ठरले पुरस्काराचे मानकरी

1. समीर शेख, सहायक पोलिस आयुक्त, 2020 करिता युनियन होममिनिस्टर मेडल फॉर एक्सलन्स इन इनव्हेस्टिगेशन

2. सिताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक राष्ट्रपती पदक

3. विजय लोंढे, पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपती पदक

4. दानिश मन्सुरी, पोलिस उपनिरीक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

5. संजय सांगळे, पोलिस निरीक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

6. वाल्मीक बाविस्कर, पोलिस नाईक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

7. नितीन चंद्रात्रे, सहा. पोलिस उपनिरीक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

8. श्याम गणपत वेताळ, सहा. पोलिस उपनिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, राष्ट्रपती पदक

9. समरसिंग द्वारकोजीराव साळवे, पोलिस उपअधिक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

10. सुनिल शिवाजी आहेर, सहा. पोलिस उपनिरीक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

11. जावेद इब्राहिम देशमुख, सहा. पोलिस उपनिरीक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

12. भाऊसाहेब भागोजी ठाकरे, सहा. पोलिस उपनिरीक्षक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

13. दिलीप माणिकराव देशमुख, पोलिस हवालदार, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

14. शांताराम गोविंद नाठे, पोलिस हवालदार, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

15. आण्णासाहेब बामन रेवगडे, पोलिस हवालदार, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

16. तुषार श्रीराम पाटील, पोलिस हवालदार, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

17. भारत एकनाथ कादंळकर, पोलिस नाईक, मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक

18. दिनेश वखार्ड्या सुर्यवंशी, पोलिस हवालदार, महाराष्ट्र पोलिस ॲकेडमी, विशेष शाखेत उत्तम कामगिरी केले बाबत

19. सचिन विष्णू अहिरराव, पोलिस नाईक, सेवेत सतत 15 वर्षे उत्तम अभिलेख राखलेबाबत

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com