देवाने दिले पण कर्माने नेले; अशी उभी राहिली होती इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक

देवाने दिले पण कर्माने नेले; अशी उभी राहिली होती इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक

शेवटची परवाना मिळालेली बँक म्हणून होती 'या' बँकेची ओळख

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देवाने दिले पण कर्माने नेले. अशी अवस्था नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेची (Nashik independence co operative bank) झाली आहे. नाशिक जिल्ह्यात शेवटचा परवाना मिळवणारी सहकारी बँक केवळ दोन चार संचालकांच्या चुकीमुळे अखेर परवाना घालवुन बसली आहे....

भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकचा परवाना नुकताच रद्द केला. सन १९९९ मध्ये रउफ पटेल (Rauf patel) यांनी नाशिकमधील काही व्यावसायिक मित्रांच्या मदतीने महत प्रयासाने या बॅकेचे रोपटे लावले होते. चांगले काम करु असा विश्‍वास त्यांना होता. त्यामुळे काही राजकीय क्षेत्रातील लोकप्रतीनिधींना चांगल्या पदावर काम करण्याची संधीही मिळाली होती.

मात्र, गेल्या दहा वर्षापासून बँकेला स्वाहाकाराचे ग्रहन लागण्यास सुरवात झाली. काही संचालकांनी घेतलले कर्ज (bank loan) परत फेडीस हात आखडता घेतला. त्यामुळे बँकेचा एनपीए (NPA) वाढत गेला. गेल्या वर्षीच बँकेवर रिझर्व बॅकेने पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते.

मात्र ९९.८९ टक्के ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स (deposit insurance) आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (Credit guarantee corporation) विमा योजनेद्वारे पूर्णपणे संरक्षित केले गेले आहे. त्यामुळे पाच लाखापर्यंतेचे ठेवीदार निर्धास्त आहेत.

बँकेनेही २ काटी ५५ लाख रुपये परत केले. सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी नव्हती. ठेवींवर कर्ज सेट करण्याची परवानगी दिली होती.

त्यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या (RBI) पूर्वपरवानगीशिवाय, कोणतेही कर्ज आणि अग्रिम मंजूर किंवा नूतनीकरण करणार नाहीत, कोणतीही गुंतवणूक करणार नाहीत, कोणतेही दायित्व स्वीकारणार नाहीत आणि इतरांसह कोणतेही पेमेंट वितरित करणार नाहीत असे निर्बंध घातले होते.

आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवता येईल असे सांगितले होते. मात्र, तरी सुध्दा बँक पुवपदावर आणणे शक्य नसल्याने अखेर परवाना रद्दची नामुष्की ओढवली आहे. एकेकाळी नाशिकमध्ये ४८ नागरी सहकारी बँका होत्या, त्यातील नाशिक पिपल्स, सप्तशृंग, बालाजी, श्रीराम या बँका बंद पडल्या. आता त्यात स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात इंडीपेंडन्स बँकेची भर पडली आहे.

पुन्हा एक बँक कमी झाली आहे. अगोदरच गेल्या २२ वर्षापासुन नवे परवाने मिळत नाही. नवीन शाखा उघडल्या जात नाही. उलट जे वैभव होते तेच कमी होत आहे. आता अवसायक नियुक्त केले जातील. ते पुढील सोपस्कार पार पाडतील. आजपर्यंतचा अवसयाकांचा अनुभव पाहीला तर ना ठेवीदारांना ना कर्मचा़र्‍यांना कोणाला फायदा झालेला दिसला नाही.

परवाना रद्द होणे हे संचालक मडळाचे अपयश आहे. त्यांनी वेळीच कठोर निर्णय घेतले असते तरी बॅक वाचविता आली असती. मात्र, बोटचेपे धोरणामुळे चांगल्या संचलाकंनाही त्याचे परीणाम भोगोवे लागतात. सहकाराच्या दृष्टीने हे अतिशय वाईट आहे.

श्रीधर व्यवाहारे ( अध्यक्ष ठेवीदाार संघटना)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com