सातपूर | Satpur

दिंडोरी येथील भारत ज्यूट इंडस्ट्रीतील कामगारांची चार हजार रूपये वेतनवाढ करार करण्यात आली.

सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड व कंपनीचे मालक अनिल ताराचंद मुखी यांची संयुक्त बैठक सिटूभवन येथे झाली.

या बैठकीत कामगारांच्या मागण्यांचा सर्वसाधारण मसुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व कामगारांना चार हजार रुपये तीन वर्षासाठी पगारवाढ देण्याचे मान्य केले.तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता देण्याचे मान्य केले.

जे कामगार ईएसआय सुविधांच्या बाहेर जातील. त्या कामगारांना मेडीक्ल्येम पॉलिसी लागु करण्यात येईल.

दरम्यान या कराराचा कालावधी जुलै २०२० ते ३० जून २०२३ पर्यंत असा तीन वर्षाचा करण्यात आला. यावेळी सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.सिताराम ठोंबरे, कंपनीचे संचालक आशिष अनिल मुखी, श्री.शुक्ला तसेच युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजेसह कमिटी मेंबर्स सदस्य उपस्थित होते.