शहरात करोना बाधीतांसाठी 313 खाटांची वाढ; गंभीर रग्णांच्या 88 टक्के खाटा भरल्या

शहरात करोना बाधीतांसाठी 313 खाटांची वाढ; गंभीर रग्णांच्या 88 टक्के खाटा भरल्या

नाशिक । दि.12 प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतच असुन वाढत असलेले रुग्ण आणि उपलब्ध खाटांची सांगड बसत नसली तरी याकरिता महापालिका प्रशासनाकडुन शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहे.

अ‍ॅक्टीव्ह रुग्ण लक्षात घेऊन महापालिकेकडुन काही खाजगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्यात आल्याने आज (दि.12) 313 नवीन खाटा वाढल्या आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात आता करोना रुग्णासाठी खाटांचा आकडा 5 हजार 786 इतका झाला आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने गंभीर रुग्णांसाठी असलेल्या खाटा 88 टक्के भरल्या आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात एप्रिलच्या अकराव्या दिवसापर्यत 27हजार 49 इतक्या करोना रुग्णांची वाढ झाली आहे. या दरम्यान 106 गंभीर रुग्णांचा मृत्यु झाला असुन दररोज सरासरी 10 जणांचा मृत्यु झाल्याने करोना बाधीतांच्या नातेवाईकांची चिंता वाढली असुन मनपा प्रशासनाकडुन आता मृत्युचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहे.

शहरातील गंभीर रुग्णांसाठी रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने आज शासनाकडुन काही नवीन निर्देश करण्यात आल्याने आता पुढच्या काही दिवसात दिलासा मिळणार आहे. महापालिका प्रशासनाकडुन आत्तापर्यत मनपा - सरकारी व खाजगी अशा 143 रुग्णालयात 5 हजार 786 खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.

यापैकी 3 हजारावर खाटावर गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. गंभीर रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या ऑक्सीजन, आयसीयु व व्हेंटीलेटर खाटांंपैकी 88 खाटांवर आजमितीत रुग्ण उपचार घेत आहे. अजुनही मोठ्या प्रमाणात रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने मनपा प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. सोमवारी (दि.11)पर्यत शहरातील रुग्णांचा आकडा 1 लाख 41 हजार 479325 इतका झाला असुन असुन 1 हजार 254 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांचा आकडा 21 हजार 148 वर आला आहे.

शहरात रविवारी मास्क संदर्भातील कारवाई

* नाशिकरोड : 4 केसेस : 2000.

* सिडको: केसेस:7 दंड:3500.

* सातपूर: केसेस:4 दंड:2000.

* ना. पुर्व: केसेस: 8 दंड: 4000.

एकुण केसेस: 23 दंड: 11500 रु.

पोलिसांमार्फत झालेली कारवाई.

* शहरातील एकुण केसेस:188 दंड: 94000 रु. * सोशल डिस्टंसिंग बाबत दंडात्मक कारवाई. * ना.रोड: केसेस:05 दंड:25000. * ना.पश्चिम: केसेस:03 दंड:15000 * ना.पुर्व: केसेस:02 दंड:10000 * सातूपर: केसेस: 01 दंड : 5000 * नवीन नाशिक केसेस 1 दंड: * एकुण केसेस:11 दंड:55000/-

सेंट्रलाईज बेड रिझव्हेर्र्शन सिस्टीम हेल्पलाईन

शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धते संदर्भात माहितीसाठी

पुढील नंबर वर संपर्क साधावा. = +919607623366 = +919607432233,

0253-2317292. खाटांसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील संकेस्थळाला भेट द्या : https://covidcbrs.nmc.gov.in शहरातील कोरोना पेशंट संदर्भात माहितीसाठी खालील संकेस्थळाला भेट द्या : https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html

शहरातील 143 रुग्णालयात कोविड रुग्ण खाटां स्थिती

मनपा आरक्षित खाटा वापरात खाटा शिल्लक खाटा

5786 4523 1263

ऑक्सीजन 2315 2068 247

आयसीयु 783 699 084

व्हेंटीलेटर 563 472 091

जनरल 2125 1284 841

कोविड सेंटर खाटा कोविड हेल्थ सेंटर कोविड रुग्णालय

1555 शिल्लक 753 3162 शिल्लक 502 1069 शिल्लक 08

(नाशिक मनपा वेबसाईडवर दि.12 एप्रिल सायंकाळी 5.30 वाजेची स्थिती)

शहरातील कोविड रुग्णालयातील स्थिती

रुग्णालय एकुण खाटा वापरातील खाटा शिल्लक खाटा

नवीन बिटको 300 298 2

जिल्हा रुग्णालय 110 110 0

डॉ. जाकीर हु. 150 150 0

एमव्हीपी 245 231 14

आपोलो 35 35 0

अशोका 80 80 0

साह्याद्री 25 25 0

व्होक्हार्ट 64 64 0

(ही आकडेवारी दि.12 एप्रिल सायं. 5.30 वाजता घेतली आहे.)

शहरात कोविड केअर सेंटरची खाटा स्थिती

रुग्णालय एकुण खाटा वापरातील खाटा शिल्लक खाटा

ना.रोड बिटको 400 398 02

फायर क्वार्टर ना. रोड 50 00 50

मेरी पंचवटी 180 48 132

शहर पोलीस 100 14 86

समाज कल्याण 500 343 157

ठक्कर डोम 320 80 240

(ही आकडेवारी दि.12 एप्रिल सायं. 5.30 वाजता घेतली आहे.)

रेमडिसीवीर संदर्भात मनपाचे आवाहन

जिल्ह्यातील करोना बाधीतांसाठी रेमडिसीवर इंजेक्शन मिळत नसल्यास त्यांनी अन्न औषध प्रशासन विभाग मो. नं. 9850177853 आणि 8780186682 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com