जिल्ह्यात कुमारी मातांचे वाढते प्रमाण
USER

जिल्ह्यात कुमारी मातांचे वाढते प्रमाण

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

जिल्ह्यात कुमारी मातांचे प्रमाण (number of virgin mothers ) वाढत असल्याची धक्कादायक माहिती आकडेवारीतून समोर आली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन वर्षात तब्बल 153 अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिला असून, लॉकडाऊननंतर हे प्रमाण वाढल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

पोक्सो कायद्यानुसार ( pocso Act ) अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणार्‍या युवकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल होत असतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये पित्याला कारागृहात जावे लागते, तर अल्पवयीन मातेला कमी वयातच बाळाची जबाबदारी पेलावी लागत आहे. काही प्रकरणांमध्ये घरातच अल्पवयीन मुलींची प्रसूती केली जात आहे.

जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातून 14 ते 18 या वयोगटातील मुली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असून, त्यात त्या गर्भवती असल्याची बाब उघड होत आहे. या मुलींवर सुरुवातीला तालुकास्तरावर उपचार केले जात असतात. मात्र, अल्पवयीन असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका असण्याची शक्यता गृहीत धरून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे.

अशी आहे आकडेवारी

एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 61 अल्पवयीन मुलींनी तर एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत 92 अल्पवयीन मुलींनी बाळास जन्म दिला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण कायम असल्याने ही बाब घडत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com