बेशिस्त वाहनचालकांनो सावधान! दंडाची रक्कम वाढवली

नियम मोडल्यास खिशाला लागणार मोठी कात्री
बेशिस्त वाहनचालकांनो सावधान! दंडाची रक्कम वाढवली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाहतुकीच्या नव्या नियमावलीनुसार (New rules of traffic) आता वाहतूक नियम मोडणाऱ्याला कमीत कमी ५०० रुपये दंड (Fine) मोजावा लागणार आहे. शहरात याची कारवाई सुरु करण्यात आली असून नागरिकांमध्ये याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. नव्या नियमावलीमुळे टोइंगसाठी (Towing) दुचाकी वाहने आणि चारचाकी वाहने यांना अनुक्रमे ५९० आणि ८५० रुपये दंड (Fine) भरावा लागणार आहे...

दरम्यान, राज्य शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ नुसार बेशिस्त चालकांवरील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. कोणताही वाहतूक नियम मोडल्यास चालकास किमान ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

त्यानुसार आता शहरात नो पार्किंगच्या (No parking) ठिकाणी वाहने उभी केल्यास दंडाच्या रकमेत २०० ऐवजी ५०० रुपये भरावे लागत आहेत. त्यामुळे टोइंग कारवाई झाल्यास दुचाकी चालकांना नव्या नियमांनुसार ५९०, चारचाकी चालकांना ८५० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

वाहतूकीस (Traffic) शिस्त लागावी, यासाठी राज्य शासनाने (State Government) दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ केली आहे. वाहतूक नियम मोडल्यास याआधी किमान २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता किमान दंडाची रक्कम ५०० रुपये केली असून जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

दंडाचे नवीन दर रविवारी (दि.१२) पासून लागू झाले आहेत. त्यानुसार इचलन दंड आकारणी झाल्यास संबंधित बेशिस्त वाहन चालकास किमान ५०० रुपयांचा दंड होणार असून त्यांनी एकापेक्षा जास्त वाहतूक नियम मोडल्यास दोन हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी होण्याची शक्यता आहे. दंडाच्या रकमेमुळे वाहतूक नियम पाळण्याचे प्रमाण वाढेल, असा अंदाज राज्य शासन व वाहतूक शाखेस आहे.

दरम्यान, दंडात वाढ झाल्यानंतर शहरातील बेशिस्त चालकांनाही याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सर्वाधिक फटका नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. टोइंग कारवाई झाल्यानंतर दुचाकी चालकांना याआधी २९० रुपयांचा दंडा होता.

मात्र आता त्यांना ५९० रुपये दंड भरावा लागत असून चारचाकी चालकांना ५५० रुपयांऐवजी ८५० रुपयांचा दंड भरावा लागत आहे. त्याचप्रमाणे इचलन मार्फत कारवाई झाल्यास थकित दंडाची रक्कमही भरावी लागत असल्याने संबंधित बेशिस्त चालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.

नागरिकांमध्ये रोष

शहरात पार्किंगची सोय नाही; जिथे वाहने लावली जातात तेथून टोइंगद्वारे कारवाई केली जात आहे. देशात भरमसाठ भाववाढ केली जात असतानाच ही भाववाढ नागरिकांना असह्य झाल्याचे एकूणच चित्र समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com