प्रवेशासाठी मनपाच्या शाळेकडे वाढला कल

शिक्षण विभागाचा अहवाल
प्रवेशासाठी मनपाच्या शाळेकडे वाढला कल

नाशिक। शुभम धांडे Nashik

करोनामुळे corona महापालिकेच्या शाळांमधील Municipal Corporation Schools दोन हजार मुले शाळाबाह्य झाली असताना, आता खासगी शाळांमधील Private Schools विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळांची वाट धरली आहे.

करोनामुळे रोजगार हिरावल्याने आर्थिक परिस्थिती खालावलेल्या पालकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. शहरामध्ये 481 खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून पालिकेच्या शाळेत प्रवेश झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे.

महापालिकेच्या 101 शाळांमध्ये एकूण 26 हजार 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात शहरात महापालिकेच्या 88 प्राथमिक शाळा आहेत. त्या शाळेत 22 हजार 479 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर 13 माध्यमिक शाळांमध्ये 3 हजार 551 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडू नये, यासाठी महापालिकेच्या शिक्षकांनी देखील ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देता आले नाही. 15 हजार 143 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था झाली. आठ हजार 838 विद्यार्थ्यांकडे सुविधा नसल्याने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण दिले गेले, तर दोन हजार 49 विद्याध्याशी संपर्क होत नसल्याने ते विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेल्याचा निष्कर्ष अहवालातून निघाला होता. परंतु, महापालिका शाळेत प्रवेश घेणार्‍यांची संख्यादेखील यावर्षात वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी

मनपा शाळेत अनेक सुधारणा. दिल्ली शासनाच्या धरतीवर दोन वर्षांत मनपाच्या शाळांचं रुपडे बदलेले दिसेल. यासाठी अनेक सामाजिक संस्था, एनजीओ, सीएसआर फंड यांच्या माध्यमातुन मनपा शाळांसाठी प्रत्येकी संगणक, इंटरनेटच्या सुविधा दिल्या जात आहे.

ही आहेत कारणे

ऑनलाइन शिक्षण असतानाही काही अपवाद वगळता सर्वच खासगी शाळांकडून 100 टक्के शुल्क वसूली. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीच्या संकटात अनेकांचे रोजगार बुडाल्याने त्यांना खासगी शुल्क भरणे परवडत नाही. खासगी शाळेमध्ये शुल्कासोबतच अन्य कारणांसाठी शुल्क भरावे लागते. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासह गणवेश, पाठ्यपुस्तके, शूज-सॉक्स, दफ्तर आदी साहित्यदेखील मोफत मिळते. शासनाच्या विविध योजना,पोषण आहाराबरोबरच शिष्यवृत्ती लाभ.

मनपात अनेक गुणवंत

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होणार्‍या परीक्षेत खासगी शाळेच्या तुलनेत अधिक अशा 19 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत . एपीजे अब्दुल कलाम ट्रस्टच्या माध्यमातून उपग्रह निर्मिती साठी अनेक विद्यार्थीची निवड तसेच शांती दुत म्हणून 147 देशातून निवडलेल्या तीन मुली मध्ये मनपा मध्ये शिकणार्‍या मुलीचा समावेश आहे.आजही अनेक उच्च शासकीय पदांवर असणारे विदयार्थी हे मनपा शाळेत शिकलेले आहेत.

नाशिक शहराचा विचार केला तर खासगी शाळांचे प्रमाण खुप अधिक आहे. त्यात विविध मार्गांनी विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याचे काम करतात. परंतू करोनाच्या मागच्या दीड दोन वर्षाच्या काळात खासगी शाळांमधील शैक्षणिक शुल्क परवडत नसल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये दाखल करीत आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात जवळपास 500 पेक्षा अधिक खासगी शाळांमधील विद्यार्थी दाखल झाले आहेत. शिक्षणाचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक डीएड, सीईटी, टीईटी सारख्या परीक्षांमधुन त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर निवडले जातात. त्यामुळे आमचा दर्जा उत्तम आहे.

तसेच येणार्‍या काळात मनपा शाळेत अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत त्यामुळें या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालकांनी आर्थिक परस्थिती सुधारली की पुन्हा खासगी कडे वळू नये ही अपेक्षा आहे.

सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com