रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात वाढ

रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात वाढ

मनमाड । प्रतिनिधी Manmad

दीपावली सणाच्या Diwali Festival पार्श्वभूमीवर प्रवाशांची वर्दळ वाढली असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथील रेल्वे स्थानकावर Railway Station सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ Increased security करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन परिसरासह येणार्‍या-जाणार्‍या रेल्वेंची श्वान पथकातर्फे कसून तपासणी पोलिसांतर्फे केली जात आहे. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास त्याची तातडीने माहिती देण्यात यावी असे आवाहन रेल्वे पोलीस अधिकार्‍यांतर्फे सातत्याने केले जात आहे.

अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर देशातील महत्वाचे रेल्वे स्थानक असतात हे लक्षात घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाड रेल्वे स्थानक महत्वपूर्ण जंक्शन आहे. येथून रोज सुमारे 125 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा होत असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यामुळे रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली असून ठिकठिकाणी आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहे.

आरपीएफ निरीक्षक ठाकूर, जीआरपी निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र तिवारी, श्वानपथक प्रमुख देवेंद्र कुंभार यांच्यासह इतर आरपीएफ यांनी रेल्वे स्टेशनचे सर्व 6 प्लॉट फॉर्म, पार्सल कार्यलय, तिकीट बुकिंग कार्यलय यासह येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांची दारा नावाच्या डॉग स्कॉटने कसून तपासणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com