इंदिरानगर । वार्ताहर Indira Nagar

लग्न समारंभात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉन्स मालक व चालक यांच्या बैठकीचे आयोजन इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आले होते.

यावेळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक लॉन्स व मंगल कार्यालय चालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, कामगारांच्या आधार कार्डची झेरॉक्स व एक छायाचित्र घेणे, दर्शनी भागात सूचना फलक लावावे आणि समारंभाच्या वेळी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना कराव्या.

तसेच वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे सूचना कराव्या. याप्रसंगी लॉन्स व मंगल कार्यालयाचे चालक व मालक उपस्थित होते.