ग्लुकोमा आजार बळावला; 300 जणांची नेत्र तपासणी

ग्लुकोमा आजार बळावला; 300 जणांची नेत्र तपासणी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

येथील लिलावती आनंदराव निर्‍हाळी चॅरीटेबल ट्रस्ट (Lilavati Anandrao Nirhali Charitable Trust) व लायन्स क्लब (Lions Club), आदित्य ज्योत आय फाऊंडेशनच्या वतीने (Aditya Jyot Eye Foundation) आयोजित मोफत नेत्र तपासणी (eye checking camp) शिबिरास तालुक्यातून रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी 3 वाजेपर्यंत तिनशेहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला...

आदित्य ज्योत आय फाऊंडेशनचे प्रमुख नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. एस. नटराजन (Dr. S. Natarajan) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मधूमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांमध्ये ग्लुकोमा (Glaucoma) हा डोळ्याचा आजार बळावत आहे. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र ग्लुकोमा मुक्त करायचा असल्याचे डॉ. नटराजन म्हणाले.

यासाठी महाराष्ट्रभर असे नेत्र तपासणी शिबिर घेणार असल्याचे ते म्हणाले. आ. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे-वानखेडे यांनीही शिबीरास भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.

यावेळी लायन्सचे कांतीभाई पटेल, महेंद्र तारगे, नगरसेवक रामभाऊ लोणारे, मुकेश चव्हाणके, डॉ. विजय लोहारकर, नेत्रतज्ञ डॉ. सारंग दराडे, डॉ. दत्तात्रय गडाख, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होते.

लिलावती निर्‍हाळी फाऊंडेशनचे संचालक नंदकुमार निर्‍हाळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी नयन निर्‍हाळी, आकाश निर्‍हाळी यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com