गंगापूर धरणातून वाढीव पाण्याची मागणी

महापौर सतीश कुलकर्णी :१६५ कोटींची टेंडरींग प्रक्रिया व्हावी
गंगापूर धरणातून वाढीव पाण्याची मागणी
Gangapur Dam Nashik

नाशिक | Nashik

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातून नाशिक महापालिका ३०० टीएमसी जास्त पाण्याची मागणी करणारत असल्याची माहिती महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली.

तर प्रशासनाला जो सुस्तपणा आला आहे, ते दुर करुन त्वरीत जोमाने काम करण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या.त्याच प्रमाणे महापालिका निवणुकीला फक्त साधारण ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

यामुळे प्रशासनाने अधिक गतीमान पध्दतीने कामे करावी. प्रत्येक प्रभागात ५ कोटी प्रमाणे साधारण १६५ कोटी रुयपांचे विकास कामांचे टेंडरींग एका महिन्यात करण्याच्या सुचना देखील महापौरांनी केल्या.

करोना काळात आरोग्य विभागाने खुप कामे केली. मात्र यातील काही कामांमध्ये गळबड निघाली तर नक्कीच कारवाई होणार.

कोणीही असे समजू नये की चौकशी होणार नाही. चुकीच्या कामाला माफी नाही, असे थेट इशारा महापौरांनी दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com