गुलाबी थंडीची चाहुल

गुलाबी थंडीची चाहुल

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीमध्ये (Cold) वाढ होत असल्याने आपल्या शरीराचे संरक्षण (body protection) व्हावे, यासाठी ग्राहकांची उबदार कपडे (warm clothes) खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत वर्दळ पाहवयास मिळत आहे.

सध्या पहाटे थंडी, दुपारी ऊन व रात्री पुन्हा गारवा असा प्रकार पहावयास मिळत आहे. त्यामुळे रुग्णांच्या (patients) संख्येत वाढ होतांना दिसत आहे. या वातावरणाच्या नागरीकांच्या शरीरावर परिणाम होत असल्याने सर्दी (winter), खोकला (cough) ताप (heat) तसेच पांढर्‍या पेशी (White blood cells) कमी होण्याचे प्रकार होत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर्षी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने शेतीपिकांची मोठी हानी झाल्याने अजूनही शेतकरी (farmers) या धक्क्यातून सावरत नाही.

तोच आता थंडीचा जोर वाढला आहे. यासाठी नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी कानटोपी, उपरणे, मफलर, स्वेटर (sweater), जकींग, हातमोजे (Gloves), पायमोजे, गॉगल, स्कार्प आदी वस्तू खरेदी करतांना दिसत आहे. सध्या शेती कामांना वेग आला असून गहु, हरबरा यांची पेरणीसाठी शेतकरी शेती मशागत करत आहे. तर काही अंशी पेरण्या होतांना दिसत आहे. असे असले तरी ही थंडी या शेतीपिकांना लाभदायी ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com