मजुरांचे लसीकरण वाढवावे

मजुरांचे लसीकरण वाढवावे

दिंडोरी । नितीन गांगुर्डे Dindori

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona) लसीकरण (Vaccination) मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत असले तरी दिंडोरी (Dindori) शहरातील मजूर (Labor) वर्गात लसीकरणाचा टक्का कमी असल्याचे सर्वेक्षणात (survey) आढळून आले आहे. कष्टकरी जनतेला ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) कमी वेळेत लस मिळत नसल्याने त्यांनी रोजगार बुडण्याऐवजी लस न घेणेच पसंत केले आहे.

दिंडोरी शहरातील गांधीनगर मित्र मंडळ, अरुणोदय सार्वजनिक वाचनालय (Arunodaya Public Library) यांच्यावतीने शहरातील दाट लोकवस्तीत सर्व्हे करण्यात आला असता, त्यांच्या पहाणीत ही बाब लक्षात आली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला मोठया प्रमाणात गर्दी होत असते.मागील दोन महिन्यांपासुन सकाळी 6 वाजेपासुन रुग्णालयात रांगा लागतात.

त्यात मध्ंयंतरी नाशिकसह बाहेरुन येणार्‍या नागरिकांचाच भरणा मोठया प्रमाणात होता. त्यावेळी अनेक दिंडोरीकरांना लसीविना परत माघारी फिरावे लागले. लस संख्यांही कमीच येत होती. ग्रामीण रुग्णालय व तालूका वैदयकिय अधिकारी (Taluka Medical Officer) कार्यालय यांच्यात ताळमेळ नसल्याने त्यावेळी वादाचेही प्रसंग उदभवले.

लस राखीव ठेवुनही लस (Vaccine) मिळत नव्हती. दिंडोरी शहराची प्रवाही लोकसंख्या 30 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे 100 आणि 150 लस आणि लोकसंख्या यांच्यात ताळमेळ बसणे अशक्यच होते. त्यातुन लस घेतांना वशिलेबाजी होत असल्याने सामान्य जनतेने ग्रामीण रुग्णालयाकडे पाठच फिरवली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात जर लसीकरणाचे ऑडीट केले तर आपल्याला मागील दोन महिन्यात बाहेरील लोकच जास्त लसीकरणाला आलेले दिसतील.

45 वर्षाच्या पुढिल लसीकरणासाठी तळेगाव आरोग्य केंद्राने दिंडोरीत सहकार्य केले.आरोग्य उपकेंद्रात लसीकरण शिबिर (Vaccination camp) झाल्याने सामान्य लोकांना लस मिळाली. दिंडोरी शहरात इंदिरानगर आणि गांधी नगर हे दोन दाट लोकवस्तीत असलेले उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रात लस आल्यानंतरच खर्‍या अर्थाने दिंडोरीकरांना लस मिळाली.

त्यानंतर झोपडपट्टी भागातही 45 वर्षापुढिल व्यक्तिंना लस देण्यात आली. आता त्यांचे प्रत्येकाचे 85 दिवस होऊन गेले आहे.यातील 80 ट्क्के लाभार्थी लसीकरणापासुन वंचित राहिले आहे. दुसरा डोस त्यांच्यापर्यंत अदयाप पोहचलेला नाही. आजही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मोठ्या मोठया रांगा आहेत. परंतु येथे 18 वर्षापुढिल तरुण लाभार्थी मोठ्या संख्येने गर्दी करतात.त्यात रांगा लांब असतात.

त्यामुळे पाच ते सहा तास थांबुन शेवटी लस मिळेल कि नाही याची शाश्वती नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन अनेकांनी लसीकरणाकडे पाठच फिरवली आहे. याच पार्श्वभुमिवर सामाजिक कार्यकर्ते पोपट चौघुले, अंकुश मोरे, हरीभाऊ चारोस्कर, चिंतामण पवार, सनी सारसळ, सागर चारोस्कर, गोकूळ भोंडवे, रोहित झुरडे, श्रीधर परदेशी, किरण माळेकर, सचिन गांगोडे आदींनी घरोघरी सर्व्हे केला.

त्यात मजुर वर्गाने अदयाप लसच घेतली नसल्याचे आढळुन आले. दाट लोकवस्तीच्या गांधीनगर, इंदिरानगर, कोळीवाडा भागात फक्त 20 टक्केच लसीकरण झाले असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. लसीकरणाकडे पाठ फिरवण्याचे मुख्य कारण म्हणजे मजुर वर्गाला रोज कामावर जावे लागते.दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात जास्त काळ रांगा लावुन काम धंदा बुडवणे मजुर, शेतकरी (Farmers) वर्गाला परवडणारे नाही. त्यात लस मिळेलच याची शाश्वती नाही.

रोजगार बुडवला तर घरात चुल पेटणेही अवघड आहे. महिला वर्गही कुटुबांच्या जबाबदारीमुळे ग्रामीण रुग्रालयाकडे फिरकत नाही. त्यामुळे 45 वर्षाच्या पुढिल अनेक नागरिक लसीपासुन वंचित आहेच परंतु तरुण वर्गही लसीकरणापासुन वंचित आहे. याबाबत दिंडोरी नगरपंचायतीने आरोग्य विभागाशी (Department of Health) पत्रव्यवहार केला आहे.

तत्कालीन तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोशिरे यांनी दिंडोरी आरोग्य उपकेद्रात गरीबांच्या सोयीसाठी लसीकरण उपलब्ध करुन देण्याचे ठरवले होते. पण तत्पुर्वीच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी नव्याने तालूका वैदयकिय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे आले आहे. त्यांच्याशी तहसिलदार तथा नगरपंचायत प्रशासक पंकज पवार, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश येवले यानी चर्चा केली आहे.

माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही दिंडोरीकराची व्यथा डॉ. मांडगे यांच्यापर्यत पोहचवली आहे. त्यामुळे गरीब मजूर, कष्टकरी जनतेची मजबुरी लक्षात घेऊन तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. मांंडगे आरोग्य उपकेंद्रात गरीबांसाठी प्रथम व त्यानंतर प्रत्येक प्रभागात लसीकरण शिबिर घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com