नाशिक । प्रतिनिधी Nashik

वाईन कॅपीटलसोबतच नाशिक सायकलची राजधानी होऊ पाहत आहे. दोन हजार सायकलिस्ट्सचे आता टारगेट वीस हजार सायकलीस्ट असल्याचे प्रतिपादन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे संस्थापक व राज्याचे सायबर क्राईमचे पोलीस उप महानिरिक्षक हरिश बैजल यांनी केले.

नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बैजल बोलत होते.

ते म्हणाले, परदेशांप्रमाणे आपल्या देशात सायकलिंगला मानाचे स्थान मिळवायचे असेल तर प्रत्येकाची ही वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळे सायकल चळवळ व्यापक व्हावी आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शहरात सुरू असलेल्या नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या सायकल चळवळीला जनसमुदायापर्यंत पोहचवण्याचे काम वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे केले जाते.

पत्रकारितेचा सिंहाचा वाटा सायकल चळवळीमध्ये आहे. नाशिकमध्ये सायकल टॅ्रक व्हायला सुरुवात झाली असली तरीदेखील महामार्गांवर अद्याप सायकलसाठी वेगळा ट्रॅक दिसत नाही. जगात अनेक देशांत अर्ध्यापेक्षा जास्त कामांना सायलीवरून प्रवास केला जातो. अनेक ठिकाणी सायकल सेंटर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामूळे येथील पर्यावरणाचा र्हास कमी झाला आहे. हवेचे प्रदुषण कमी झालेले आहे. नाशिक सायकलीस्टकडून दरवर्षी सायकल राईड केली जाते. यादरम्यान जीव मुठीत धरुन सायकल चालवाली लागते. ही परिस्थिती दुर झाली पाहिजे असे मत बैजल यांनी मांडले.

याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, मोहन देसाई, माधुरी गडाख, सुरेश डोंगरे, देविंदर भेला, साधना दुसाने, रवींद्र दुसाने, डॉ. आबा पाटील, डॉ. नितीन रौंदळ, यशवंत मुधोलकर, गणेश माळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मनिषा रौंदळ यांनी केले तर आभारप्रदर्शन किशोर माने यांनी केले.

यांचा झाला सन्मान

दिनेश सोनवणे, कपिल भास्कर, हर्षवर्धन बोर्हाडे, सुनिता चौहान, के. के. अहिरे, अनिल वैद्य, माधुरी वैद्य, तुषार जगताप, मिलिंद सजगुरे , नितीन भोसले, योगेश्वर कोठावदे, हितेश शहा, रामदास नागवंशी ,सचिन जैन, प्रवीण नेटवणे, रवींद्र आखाडे यांचा सन्मान करण्यात आला.