नाशकात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; मनपातर्फे 'इतके' ऑक्सिजन बेड सज्ज

Corona
Corona

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरात गेल्या काही दिवसात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत असून 36 बाधित रुग्णांपैकी एकास रुग्णालयात उपचार दिले जात असून उर्वरित पस्तीस करोना बाधितांना होमक्वारंटाइन करून उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, त्यासोबतच शहरातही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या शहरात पॉझिटिव्ह असलेले 36 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 35 रुग्ण हे सर्वसाधारण लागण झालेले असल्याने त्यांना घरातच विलगीकरणात (Isolation) ठेवण्यात आले आहे. फक्त एक रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.

Corona
महाराष्ट्रात 'येथे' मास्क सक्ती; वाढत्या कोरोनाच्या धास्तीने घेतला निर्णय

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मनपाचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, शहरातील बिटको रुग्णालय व झाकीर हुसेन रुग्णालयात (Bytco Hospital and Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनचे बेड सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

बिटको रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त 650 बेड सज्ज ठेवण्यात आले असून, झाकीर हुसेन रुग्णालयात 150 ऑक्सिजन बेड (Oxygen bed) सज्ज करण्यात आलेल्या आहेत.

Corona
शिवसेना भवनावर आमचा दावा नाही!; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

बाधितांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिरलसीबाबत चौकशी केली असता शहरात शासकीय रुग्णालयांमध्ये एकही लस शिल्लक नसून, मागणी देखील शून्यावर आहे. तर खाजगी रुग्णालयात नाकातून टाकणारी लस काही प्रमाणात उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सर्वसामान्य जनता लस घेण्याबाबत उत्सुक नाही. यापूर्वी नागरीकांच्या निरुत्साहामुळे शासनाकडे लस पडून राहिलेली होती. मात्र मागणी वाढल्यास लस उपलब्ध करून दिली जाईल असे आरोग्य विभागाकडून (Department of Health) कळविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com