गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ

गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरण ( Gangapur Dam) समूहात पावसाने जोर धरल्याने एकाच दिवसांत गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत नाशिक शहरात 36.24 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर कोसळणार्‍या पावसाचा काल सकाळपासून जोर ओसरला असून काल सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 1.1 मिमि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे कालच्या पावसानंतर गतवर्षाच्या टक्केेवारी एवढा म्हणजेच 38 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे तूट भरुन निघाली आहे. नाशिक शहरात ंयंदाच्या मोसमात पहिल्यांंदा नदी नाले दुथडी भरुन वाहतांंना दिसत आहेत.

गंगापूर धरण क्षेत्रात 234 मिमी इतका पाऊस पडला असून पाणलोट क्षेत्रातून मोठी आवक होऊ लागल्याने गंगापूर धरण 49.71 टक्के भरले आहे.

दुसरीकडे दारणा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून जलाशयातील पाणीसाठा काल सकाळी 75 टक्के झाला आहे. त्यामुळे दारणा जलाशयातून विद्युत गृहाद्वारे काल सकाळी 10 वाजता 550 क्यूसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

त्रंबकेश्वर मध्ये पाऊस सुरुच होता . गोदावरीच्या पुराचे पाणी बाजारात शिरले नाशिकमध्ये नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.काल सकाळी अकराला होळकर पुलाखालून 1100 क्युसेक्स पाणी वाहत होते. आगामी दोन दिवस वार्‍याचा वेग वाढत राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 20 कि.मी वेगाने वाऱे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. पाऊस सुरुच राहील्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयाचे रेडीयल गेट्सच्यामधून आणखी विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

भावली धरणाचासाठाही 61 टक्कयांवर गेला आहे. 24 धरणातील साठा 28 टक्कयांवरुन 31 टक्के झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारून असलेल्या पावसाने अखेर नाशिक शहरासह जिल्ह्यात कालपासून हजेरी लावली आहे. काल दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी नाशिक शहरात सुरु होत्या. यानंतर दहीपूल परिसरातील सखल भागातील अनेक दुकानात पाणी शिरत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. अनेकांची वाहनेही यावेळी पाण्यात गेली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com