धरण
धरण
नाशिक

दिंडोरी तालुक्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसापासून समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दिंडोरी तालुक्यात पाऊसाचे आगमन उशिरा झाले त्यांमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल आशी स्थिती होती.

मात्र सध्या तालुक्यातील धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरण ३७ टक्के तर वाघाड धरण ४०.११ टक्के तसेच पालखेंड धरणात ७०.४२ टक्के पुणेगाव २७.१६ टक्के, ओझरखेंड ४४.०६ टक्के , तीसगाव १०.८९ टक्के धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे त्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे दिसून येत आहे.

पाऊस जरी उशिरा चालू झाला असला तरी पाऊसाची परिस्थिती अशीच काही दिवस राहिल्यास धरण पाणीसाठ्या मध्ये चांगली वाढ होऊ शकते आशे आशादायक चित्र सध्या तरी तालुक्यात दिसून येत आहे.

त्यांत दिंडोरीच्या पश्चिम भागात चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आज सकाळ पासून दिंडोरी तालुक्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे धरणामध्ये येणा-या पाण्याचा वेग मंदावला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com