महिला अत्याचारात वाढ
महिला अत्याचारात वाढ
नाशिक

महिला अत्याचारात वाढ

सात महिन्यांत 30 अत्याचार, 120 विनयभंग

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । NASHIK (प्रतिनिधी)

शहरात महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून करोना लॉकडाऊन काळातही यामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील सहा महिन्यात 120 महिला व मुलींचे विनयभंगाचे प्रकार घडले तर 30 अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. यातील 70 टक्के तक्रारी लॉकडाऊन काळात नोंद झाल्या आहेत.

जानेवारी 2020 ते जुलै 2020 या सात महिन्यांच्या कालावधीत 120 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 26 घटना फेब्रुवारी महिन्यातील आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात यातील 70 घटनांची नोंद झाली आहे. बलात्काराच्या 30 घटना मागील सात महिन्यात घडल्या असून सर्वाधिक 7 फेब्रुवारी तसेच आता जुन महिन्यात नोंदवल्या गेल्या आहेत.

30 पैकी 20 घटना लॉकडाऊन काळात घडल्या आहेत. यामध्ये कौंटुबिक अत्याचाराचे प्रमाण मोठे असल्याचे माणले जात आहे. जवळचे नातेवाईक, ओळखीचे, शेजारी यांच्याकडून या घटना घडल्याचे समोर येत आहे. दोन घटनांमध्ये मुलींना वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचे समोर आले आहे.

अनेक घटना प्रेम प्रकरणातून तसेच फसवणुकीतून झाल्या आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचा यामध्ये सामावेश आहे. तर आता ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून मुली तसेच महिलांचे अश्लिल फोटो तयार करून ते सोशल मिडियात व्हायरल करण्याचे दोन प्रकार समोर आले आहेत.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात महिला तसेच मुलींवर अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढते असल्याने त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे बोलले जात आहे पोलिसांनी संशयितांवर कडक कारवाईची मागणी नागरीकांमधून होत आहे.

अशा घटना

महिना विनयभंग बलात्कार

जानेवारी 24 3

फेब्रुवारी 26 7

मार्च 22 0

एप्रिल 4 1

मे 14 6

जून 19 7

जुलै 11 6

एकुण 120 30

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com