
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात ढगाळ वातावरण, सकाळी पडणारे धुके यामळे बाजार समितीमध्ये भाजीपाला (Vegetables) आवक मंदावली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे...
कारले ४५ रुपये, वांगी १००रुपये तर भेंडी ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फळबाजारातही (Fruit Market) फळांची आवक मंदावली असल्याने फळांच्या दरातही तेजी आहे.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे (Rain) बाजारपेठांमध्येही परजिल्ह्यातील भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. यामुळे नाशिककडील भाजीपाल्याला परजिल्ह्यातही चांगली मागणी वाढल्याने पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
वांगी १०० रुपये
ठोक बाजारात वांगी सर्वसाधारणपणे १०० रुपये किलो दरापर्यंत विकली जात असल्याने विक्रेत्यांनी वांग्याचे दर वाढविले आहेत. गावठी कोथिंबिरीला ३० रुपये, तर मेथीला २५ रुपये जुडी इतका दर आहे. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी या भाज्याही महागल्या आहेत.