जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

यंदाचा पाऊस ( Rain ) लवकर येणार असल्याच्या वेधशाळेच्या भाकितांना चुकीचे ठरवत जून महिन्याची 15 तारीख उलटून गेली तरीही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ( Farmers) आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मुख्यतः जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

गतवर्षी या कालावधीत पावसाला सुरुवात झाल्याने टँकर्सची संख्या घसरली होती. यंदा मात्र पाऊसच न झाल्याने टँकर्सची संख्या दुपटीने वाढली असल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये मात्र अजूनही प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 84 टँकर्स सुरू आहेत.

गतवेळी जूनच्या पंधरवड्यापर्यंत पावसाचे आगमन झाल्याने टँकरची संख्या कमी होऊन 41 पर्यंत खाली आली होती. सद्यस्थितीत 252 वस्ती व वाड्यांची टँकरने ( Water Tankers )तहान भागवली जात आहे. जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यांमध्ये 84 टँकर सुरू आहे. 252 गाव व वाड्यांवरील एक ते दीड लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवला तालुक्यात 20 टँकर सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com