सातपूर | Satpur

सातपूर परिसरात रुग्ण संख्या वेगाने वाढू लागली असून आरोग्य विभागाची डोकेदुखी त्यामुळे दुपटीने वाढली आहे.

एकट्या शनी चौक परिसरात तीस पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने संपूर्ण परिसर नाकाबंदी करण्यात आली आहे.

सातपूर कॉलनी परिसरातील अशोक नगर येथील जाधव संकुल लगत असलेल्या शनी चौकात काल एकाच दिवशी तीस संशयीत आढळून आले असून त्यातील 25 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले आहे.

त्यामुळे वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेत आरोग्य तपासणी सोबतच रुग्ण परिसरातील संशयित व संभाव्य रुग्णांची माहिती गोळा करण्याचे काम गतिमान केले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते सातपूर विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी नितीन नेर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे मुख्य नोडल अधिकारी डॉक्टर बागी सातपूर कॉलनी रुग्णालयाच्या रोहिणी जोशी पंडित आदींसह पदाधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. परिसराला संपर्क करत असलेल्या विविध मार्गांची नाकेबंदी करण्याचे निर्देश दिले त्यानुसार बांबूने रस्ते बंद करण्यात आले.