जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक वाढला; आज ३१ बळी

आज 3 हजार 343 पॉझिटिव्ह रूग्ण; आज कोरोना पॉझिटिव्हपेक्षा करोनावर मात करणार्‍या रूग्णांची संख्या अधिक
जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक वाढला; आज ३१ बळी

नाशिक । प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असताना आज कोरोना पॉझिटिव्हपेक्षा करोनावर मात करणार्‍या रूग्णांची संख्या अधिक झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज एकाच दिवसात 4 हजार 21 रूग्णांनी करोनावर मात केली. तर दिवसभरात अडीचशेने पॉझिटिव्ह घटून ही संख्या 3 हजार 343 आली आहेत. तर आज 31 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागात करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. रविवारी घट होऊन हा आकडा 3 हजार 588 वर पोहचला होता. आज यामध्ये 245 ने घट आली आहे. असे असले तरी इतर दिवसांच्या तुलनेत हा आकडाही मोठा आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 36 हजार 972 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 21 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 98 हजार 288 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 343 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 853 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 45 हजार 65 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 369 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 78 हजार 700 झाला आहे.

मालेगावात 111 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 9 हजार 920 झाला आहेे. जिल्हा बाह्य 10 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 287 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 16, नाशिक शहरातील 14 रूग्ण आहेत, मालेगाव 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 752 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात निम्म्याने घट झाली असून 2 हजार 214 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 हजार 873 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 251 तर मालेगाव येथील 60 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,36,972

* नाशिक : 1,45,065

* मालेगाव : 9,920

* उर्वरित जिल्हा : 78,700

* जिल्हा बाह्य ः 3,287

* एकूण मृत्यू: 2,752

* करोनामुक्त : 1,98,288

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com