निफाड तालुक्यात करोना रुग्णसंख्येत वाढ

उपस्थिती मर्यादा न पाळणार्‍यांवर कारवाई करा; प्रांत डॉ. पठारे यांचे आदेश
निफाड तालुक्यात करोना रुग्णसंख्येत वाढ

निफाड । प्रतिनिधी Niphad

तालुक्यात करोना (corona) रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खासगी अस्थापनात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा न पाळणार्‍या विरोधात दंडात्मक कारवाई (Punitive action), नो व्हॅक्सिन नो एंट्री (No vaccine, no entry) या प्रणालीचे सक्तीने पालन व लसीकरणाचे (vaccination) उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्देश देण्यात आले असून दररोजच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे (Sub Divisional Officer Dr. Archana Pathare) यांनी दिले आहे.

तालुक्यातील वाढती करोना रुग्णसंख्या यामुळे उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी (Police officer), तहसीलदार (Tehsildar), गटविकास अधिकारी (Group Development Officer), तालुका आरोग्य अधिकारी (Taluka Health Officer), विविध आरोग्य अधिकारी (Health Officer) व महसूल विभागाचे (Revenue Department) सर्कल ऑफिसर, तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) यांची तातडीने बैठक घेऊन 50 टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थितीचे निकष न पाळणार्‍या खासगी आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

तसेच तालुक्यातील लसीकरणाची प्रक्रिया (vaccination) पूर्ण करण्याचे आदेश दिले. शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत गेल्या सप्ताहात 120 असणारी करोना रुग्णसंख्या 426 इतकी पोहोचली असून ती नाशिक जिल्ह्यात (nashik distirct) सर्वाधिक आहे. करोना रुग्णसंख्या वाढत आहे परंतू चिंताजनक रुग्ण नाही ही प्रशासनाला समाधानाची बाब असली तरी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी बोलताना प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी पहिला डोस घेतलेल्या लसीकरण नागरिकांची संख्या 85 टक्के असून दुसर्‍या डोसचे प्रमाण 56 टक्के इतके आहे. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी पहिला डोसचे 15 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे व दुसर्‍या डोसचे 44 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी दररोज स्थानिक आरोग्य अधिकारी सक्षम यंत्रणा उभी करणे व पहिला डोस घेतलेल्या नागरिकांशी संपर्क साधून लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे याचा दररोज प्रगती अहवाल तालुका आरोग्य अधिकारी यांनी देण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार निफाड तालुक्यात (niphad taluka) रुग्ण संख्या पाहता विवाह समारंभात 50, अंत्यविधीला 20 लोकांची उपस्थिती बाबत स्थानिक प्रशासनाने धडक मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार 50 टक्के उपस्थितीचे आदेश खासगी आस्थापनांनी पाळणे गरजेचे असूनही ज्या अस्थापनाचे प्रमुख या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्यासह निर्बंध तोडणार्‍या विरुद्ध दंडात्मक कारवाई (Punitive action) करावी असे निर्देश प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी दिले.

तालुक्यातील ओझर बरोबरच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) तसेच बाजार आवारामुळे शेतकरी (farmert वर्गाची गर्दी पाहता करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी बाजार आवरावर देखील लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांनी प्रतिबंधक झोन बाबत तातडीने लक्ष घालून करोना रुग्ण होम आईसोलेटेड आहेत की नाही याचे दररोज अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यात वाढती करोना रुग्ण संख्या ही चिंताजनक बाब आहे.

शासनाने पिंपळगाव (pimpalgaon) येथील करोना (corona) उपचार केंद्रात कोविड सेंटर (Covid Center) येथे 200 बेडचे ऑक्सिजनचा पुरवठा (Supply of oxygen) असलेले उपचार सुविधा केंद्र आहे. त्यात केवळ सात ते आठ रुग्ण उपचार घेत असून रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे संभाव्य रुग्णांची संख्या विचारात घेऊन पिंपळगाव बसवंत येथील 200 खाटांचे करोना सेंटर बरोबरच रसलपूर येथे 100 खाटांचे करोना उपचार केंद्रास मान्यता आली आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील 30 खाटांची रुग्ण उपचाराची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

पिंपळगाव बसवंत (pimpalgaon basvant), निफाड (niphad), लासलगाव (lasalgaon) या तीन ठिकाणी ऑक्सिजन व्यवस्था पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर चांदोरी व खडकमाळेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन संयंत्राची निर्मिती झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व करोना प्रतिबंधक कारवाई करण्याची उपस्थित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आली आहे व त्याचे अहवाल देखील देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीप्रसंगी निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका संपर्क अधिकारी डॉ.चेतन काळे, वैद्यकीय अधिकारी सुनील कोशिरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com